तुकाराम मुंढे चहासाठी कोणत्या कंपनीचं दूध वापरतात? नेमकं ब्रँडचे नाव काय?

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहते त्यांना ते कोणत्या कंपनीचं दूध वापरतात? असा प्रश्न विचारत आहे.

तुकाराम मुंढे चहासाठी कोणत्या कंपनीचं दूध वापरतात? नेमकं ब्रँडचे नाव काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 11, 2026 | 6:41 PM

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या कडक प्रशासकीय कार्यशैलीसाठी नेहमीच चर्चेत असतात. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी त्यांची ओळख आहे. विशेषतः भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित पदार्थ आणि अस्वच्छ अन्ननिर्मितीविरोधातील त्यांच्या कारवायांमुळे ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

मात्र, याच दरम्यान तुकाराम मुंढे यांचा एक वेगळाच अंदाज दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंढे हे आपल्या मित्रांसाठी आणि भाऊ अशोक मुंढे यांच्यासाठी चहा बनवताना दिसत आहेत. त्यांच्या या साध्या आणि अनौपचारिक अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, सोशल मीडियावर या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

मित्रांसाठी स्वतः बनवला चहा

इन्स्टाग्रामवरील ‘rohanbhamkar’ या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये तुकाराम मुंढे अगदी साध्या पद्धतीने चहा बनवताना दिसतात. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अशोक मुंढे आणि काही मित्रही असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

खरं पाहता, मित्रांसाठी चहा बनवणं ही काही फार मोठी किंवा विशेष घटना नाही. मात्र, तुकाराम मुंढे यांची सार्वजनिक प्रतिमा ही कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी असल्याने त्यांचा हा साधा अंदाज नेटकऱ्यांना विशेष भावला आहे.

FDA आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अन्ननिर्मितीविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या हातून तयार झालेल्या चहाकडेही नेटकऱ्यांनी मिश्कीलपणे ‘FDA’च्या चष्म्यातून पाहिलं आहे.

‘FDA अप्रूव्ह्ड चहा’ म्हणत नेटकऱ्यांची भन्नाट कमेंटबाजी

या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स करत तुकाराम मुंढे यांच्या या अंदाजाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने गंमतीने विचारलं, ‘सर, चहामध्ये तुम्ही दूध कुठलं वापरता ते सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा तेच दूध घरी मागवू.’ तर दुसऱ्या एका युजरने थेट प्रश्न केला, ‘सर, हा चहा FDA अप्रूव्ह्ड आहे का?’

काहींनी तर या चहाला ‘FDA अप्रूव्ह्ड चहा’ अशी मजेशीर उपमा दिली आहे. त्यांच्या कडक प्रशासकीय प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर चहा बनवतानाचा हा साधा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यही वाटलं आहे. मात्र, तुकाराम मुंढे हे कोणत्या ब्रँडचं दूध वापरतात हे अद्याप समोर आलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us