AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! गिरीश महाजन यांची सीडी कोणाकडे? एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

आज जामनेरमध्ये भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं, त्याला प्रत्युत्तर देताना खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोठी बातमी! गिरीश महाजन यांची सीडी कोणाकडे? एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
| Updated on: Aug 08, 2025 | 9:17 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान यावरून आता  वातावरण चांगलंच तापलं आहे. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपच्या वतीनं एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे? 

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या या प्रफुल लोढाकडे आहेत, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी खडसे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कशाला आंदोलन करून जोडे मारता गिरीश महाजन यांना जोडे मारा, प्रफुल लोढाला जोडे मारा. माझ्या विरोधात भाजपचे आंदोलन सुरू आहे, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले काय रे कशाला आंदोलन केलं, तर तो मला म्हणाला वरून आदेश आलेत, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं, असा खोचक टेला यावेळी खडसे यांनी लगावला आहे.

विषारी पिल्लांना मी मोठं केलं याचं मला दुःख वाटतं,  मी कधीही माझ्या जावयाचं समर्थन केलं नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत, असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे.

माझं नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅपवरून  लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झालं तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, असा इशाराही खडसे यांनी दिला आहे.

खेवलकर प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडघशी पडले आहेत. लोढाकडे कोणत्या व्हिडीओ क्लिप आहेत त्या तपासा.  कोणत्या मंत्र्याच्या सीडी आहेत ते तपासा, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये 72 अधिकारी आणि चार मंत्री आहेत, याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...