Ajit Pawar Death In Plane Crash : अजित पवार यांच्या विमानाची कमान ज्यांच्या हाती होती, ते कॅप्टन सुमीत कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक कोण?

Ajit Pawar Death In Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खासगी विमान 'लेयरजेट 45' क्रॅश झालं. दुर्घटनेत सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या विमानाची कमान कॅप्टन सुमीत कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक यांच्या हाती होती.

Ajit Pawar Death In Plane Crash : अजित पवार यांच्या विमानाची कमान ज्यांच्या हाती होती, ते कॅप्टन  सुमीत कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक कोण?
first officer shambhavi pathak
| Updated on: Jan 28, 2026 | 1:15 PM

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस खूप दुर्देवी ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपी प्रमुख अजित पवार यांचं चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या चार्टर्ड विमानाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन सुमीत आणि फर्स्ट ऑफिसर शाम्भवी पाठक यांच्या हाती होती. पिंकी माळी या विमानात फ्लाइट अटेंडेंट होत्या.

VSR वेंचर्सच लेयरजेट 45 (Learjet 45) हे विमान होतं. त्याचं रजिस्ट्रेशन VT-SSK असं आहे. या विमानाचं एकूण वजन 9752 किलोग्रॅम होतं. शाम्भवी यांनी वर्ष 2022 मध्ये VSR कंपनीत कामाला सुरुवात केली. शाम्भवी यांनी मुंबई विद्यापीठातून एविएशनचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक पायलट अकादमीत तिने वर्ष 2018 ते 2019 पर्यंत ट्रेनिंग घेतलं. कॅप्टन सुमीत कपूर यांच्याकडे 16 वर्ष विमान उड्डाणाचा अनुभव होता.

याआधी VSR कंपनीच्या विमानाला कधी अपघात झालाय?

VSR Ventures Pvt Ltd दिल्लीतील एक प्रायवेट एविएशन कंपनी आहे. 2011 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली. भाड्यावर एअरक्राफ्ट देण्याशिवाय एविएशन कंसलटेंसी मध्ये सुद्धा ही कंपनी काम करायची. कॅप्टन विजय सिंह आणि कॅप्टन रोहित सिंह या कंपनीचे मालक आहेत. 14 सप्टेंबर 2023 रोजी सुद्धा या कंपनीच एक प्लेन मुंबई विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालं होतं.

विमानाने पेट घेतला

अजित पवारांच्या विमानाचा अपघात 8:45 ते 9:15 दरम्यान झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला चालले होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिथे त्यांच्या प्रचारसभा होणार होत्या. बारामती रनवेवर लँडिंग दरम्यान विमानात टेक्निकल बिघाड झाला. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात जाऊन कोसळलं. जमिनीवर धडकताच विमानाच्या चिंधड्या उडाल्या. विमानाने पेट घेतला. मृत प्रवाशांमध्ये अजित पवार, विदीप जाधव यांची नाव आहेत.

अपघाताच्या चौकशीचे आदेश

नागरी विमान वाहतूक संचालनालयानुसार (DGCA) या दुर्घटनेत अजित पवार, त्यांचे खासगी सहायक (PA), सुरक्षा गार्ड आणि दोन पायलटसह एकूण 5 जणांनी जीव गमावला. विमान जळून पूर्णपणे खाक झालं. DGCA ने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवार आज बारामती येथे चार मोठ्या जनसभांना संबोधित करणार होते. त्यासाठी सकाळपासूनच समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. पण सभेच्या बातमी आधी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सगळं राज्य शोकसागरात बुडालं.