कांदा महागला म्हणून मोदीजी कांदे उगवतील का? : बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना रामदेव बाबांनी (Ramdev Baba onion price) विविध विषयांवर भाष्य केलं. 

कांदा महागला म्हणून मोदीजी कांदे उगवतील का? : बाबा रामदेव
Follow us
| Updated on: Dec 09, 2019 | 12:19 PM

अहमदनगर : योगगुरु बाबा रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना रामदेव बाबांनी (Ramdev Baba onion price) विविध विषयांवर भाष्य केलं.  “देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई वाढत आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. देशात अनेक आव्हाने आहेत. हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही काय करताय? असा सवाल विचारत, आपण सर्वांनी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे”, असा सल्ला रामदेवबाबांनी (Ramdev Baba onion price) विद्यार्थ्यांना दिला.

रामदेव बाबा म्हणाले, “आपण समस्या मोजत बसण्यापेक्षा या समस्येचं निराकरण कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, तसा संकल्प करा. एकटे मोदी काय करतील? कांद्याचे दर वाढले म्हणून मोदी काय कांदा उगावतील का? दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वत: कीर्तिमान बना”

मोदी कांदे उगवतील का?

“काही मुलं अभ्यासावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, काही लोक कामावेळी कामाकडे दुर्लक्ष करतात. मग म्हणतात बेरोजगारी वाढतेय. देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढतेय, गरिबी वाढतेय, देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे. देशात अनेक आव्हानं आहेत असा पाढा वाचतात. ते सर्व ठिक आहे, पण तू काय करतो आहेस? आपण समस्या मोजणारे बनू नये, आपण आयुष्यात असं काही करावं, की सर्व समस्यांचं निराकरण करुन, नवा कीर्तिमान उभा करावा, असा संकल्प मुलांनी करावा. अन्यथा लोक मोदींना दोष देत बसतील. मोदीजी रोजगार द्या, मोदीजी आमच्या शेतीमालाला भाव द्या, मोदीजी महगाई हटवा, कांद्याचे दर वाढले आहेत, मग आता मोदीजी कांदे उगवतील का? तर गोष्ट ही आहे की आपल्या स्वत:ला मोठं काम करावं लागेल. आम्ही केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते दरिद्री, कंगाल असतात. आपल्या कर्माने, पुरुषार्थाने आपलं आणि इतरांचं भाग्य घडवणारे आपल्याला बनायचं आहे”, असा सल्ला रामदेव बाबांनी मुलांना दिला.

संगमनेर येथे बाबा रामदेव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता परिवाराच्यावतीने गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 30 हजार विद्यार्थ्यांनी भगवतगीतेच्या 12 ते 15 व्या अध्यायांचे सामूहिक पठण केले.

बाबा रामदेव आणि मोहन भागवतांनी या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भव्य प्रमाणात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.