AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परप्रांतीय मुली, 28 वेळा हॉटेलचं बुकिंग, प्रांजल खेवलकरांवरील नव्या आरोपाने खळबळ!

पुण्यातील खराडी येथे रात्री चालू असलेल्या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण नंतर राज्यभरात गाजले. पार्टीत खडसेंच्या जावयाला रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

परप्रांतीय मुली, 28 वेळा हॉटेलचं बुकिंग, प्रांजल खेवलकरांवरील नव्या आरोपाने खळबळ!
| Updated on: Aug 05, 2025 | 6:54 PM
Share

Pranjal Khewalkar : पुण्यातील खराडी येथे रात्री चालू असलेल्या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण नंतर राज्यभरात गाजले. पार्टीत खडसेंच्या जावयाला रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या रेव्ह पार्टीत अमलीपदार्थ सदृश वस्तू आढळल्या, दारूच्या बॉटल्स आढळल्या, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, आता याच प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिला आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिला आयोगाने नेमकी काय कारवाई केली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर यांना पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेली असताना आता महिला आयोगाने मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. महिला आयोगाने थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. तसेच खेवलकरांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला आयोगाच्या पत्रात नेमकं काय आहे?

सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने राज्य महिला आयोगाकडे खेवलकर यांची एक तक्रार केली आहे. याच तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलवल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मानवी तस्करीसंदर्भात केलेल्या आरोपींची चौकशी करावी, असं महिला आयोगाने पुणे पोलिसांना म्हटले आहे.

दरम्यान, आता या तक्रारीनंतर प्रांजल खेवलकर यांच्यातर्फे तसेच एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महिला आयोगाच्या पत्रानंतर आता पुणे पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था