तांदूळवाडीच्या शेतकऱ्याची कमाल, कलिंगड शेतीतून 51 दिवसात 51 लाखाचं उत्पन्न

| Updated on: Aug 03, 2021 | 1:22 PM

तांदूळवाडी गावातील सुनील चव्हाण या शेतकऱ्याला त्यांच्या 6 एकर शेतात लावलेल्या कलिंगड्याच्या पिकातून 51 दिवसांत 51 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

तांदूळवाडीच्या शेतकऱ्याची कमाल, कलिंगड शेतीतून 51 दिवसात 51 लाखाचं उत्पन्न
Follow us on

सोलापूरः कोरोना काळात सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल झालेत. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झालंय. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही सोलापुरातल्या एका शेतकऱ्यानं सर्वांसमोर आदर्श निर्माण केलाय. कोरोना काळात शेतकऱ्याची मेहनत त्याला लखपती बनवणार आहे. तांदूळवाडी गावातील सुनील चव्हाण या शेतकऱ्याला त्यांच्या 6 एकर शेतात लावलेल्या कलिंगड्याच्या पिकातून 51 दिवसांत 51 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

6 एकर शेतात कलिंगडाची लागवड

माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावातील सुनील चव्हाण यांची 6 एकर शेती आहे. एकाच पिकाच्या मागे न धावता त्यांनी नेहमी शेती करताना बाजारात ज्याला चांगला भाव येऊ शकतो, अशा पिकांची लागवड केली. 2 महिन्यांपूर्वी त्यांनी 6 एकर शेतात कलिंगडाची 35 हजार रोपे लावली होती. त्याची वेळोवेळी चांगली निगाही राखली. चांगली फळधारणा होण्यासाठी खतांची मात्र दिली.

किलो मागे त्यांना 34 रुपये एवढा भाव मिळालाय

आता चव्हाण यांच्या शेतातील कलिंगड तोडणी हंगाम सुरू झालाय. सध्या त्यांच्या शेतातील कलिंगडाची विक्री सुरू झालीय. किलो मागे त्यांना 34 रुपये एवढा भाव मिळालाय. त्यांच्या शेतातून 140 टन कलिंगड निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 51 दिवसांत 51 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न चव्हाण यांना मिळण्याची आशा आहे.

जिरे शेतीतून 50 कोटींची उलाढाल

गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील योगेश जोशी या युवा शेतकऱ्यानं जिरे शेतीतून (Cumin) प्रगती साधली होती. योगेश जोशी यांना जिरे शेतीला व्यावसायिक स्वरुप दिलं होतं. आता योगेश जोशींसोबत 3 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. तर योगेश जोशींच्या जिरे शेती व्यवसायाची उलाढाल 50 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. शेतीमध्ये सुरुवातीच्या काळात अपयश आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन योगेश जोशींनी या क्षेत्रात घेतलेली भरारी प्रेरणादायी होती.

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीने मारलं, तरीही संकटाला गाढलं, इंदापूरच्या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीतून 6 लाख कमावले

डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!

work of the farmers will finally pay off and they will get in WATERMELON farming income of Rs 51 lakh in 51 days