आकाशच पारखं झालं… जगाचा पोशिंदा खचला, एक दोन नव्हे एका जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

Farmer : शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि मेहनतीमुळे संपूर्ण जगाचे पोट भरले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. यामुळे 22 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

आकाशच पारखं झालं... जगाचा पोशिंदा खचला, एक दोन नव्हे एका जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
Farmer
Image Credit source: Google
| Updated on: Feb 06, 2026 | 8:13 PM

शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि मेहनतीमुळे संपूर्ण जगाचे पोट भरले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अनेकदा पावसामुळे किंवा दुष्काळामुळे अनेकदा पिके नष्ट होतात. यंदाही शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट ओढावले होते. य़ामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता यवतमाळमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

22 शेतकऱ्यांची आत्महत्या

सततच्या नापि‍की मुळे कंटाळून मनोधैर्य खसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. अतिवृष्टी, सावकारी कर्ज, बँकेचा कर्ज वसुलीसाठी तगादा असे एक ना विविध कारणामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे. अशातच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांच्या उत्पादनात या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडावं कसं यावे विवंचनेत 22 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संविली.

उत्पादनात घट

यवतमाळच्या लोणी येथील सुनील चव्हाण या 35 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या वडिलोपार्जित दहा एकर शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाची लागवड केली. मात्र उत्पन्न कमी झाल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढल्याने कर्ज फेडावे कसे यात त्याने 19 जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्या केली. वडील किसन चव्हाण यांना परालाइज असल्याने अनिल आणि सुनील हे भाऊ शेती पाहायचे. यावर्षी त्यांनी खाजगी व बँकेचे कर्ज घेऊन शेती केली. मात्र, निसर्गाच्या कोपाचा फटका बसला. 5 एकरात 5 क्विंटल सोयाबीन आणि दुसऱ्या 5 एकरात केवळ 12 क्विंटल कापूस निघाला. वास्तविक पाहता अडीच ते 3 लाख रुपये यासाठी खर्च झाला होता. परंतू लाखाच्याही घरात उत्पादन आलेले नाही. त्यामुळे या कुटुंब वर कर्ता पुरुष गमावला.

शेतकरी संकटात

यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती एकच हाती आले नाही. वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवून आणि बँकांकडून कर्ज घेऊन शेतीचा खर्च केला, मात्र उत्पादन आणि शेतीला नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांच्या अवस्था दयनीय झाली आहे. शेतकरी कर्जाच्या संकटातून बाहेर निघावा यासाठी शासनाच्या काही योजना आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता शेती करणे गरजेचे आहे.