Video Yavatmal | यवतमाळात उन्हासोबतच राजकीय वातावरण तापलं; वाढीव मोबदल्यावरून आंदोलन, माजी आमदार विद्यमान आमदारांवर धावले

| Updated on: Apr 30, 2022 | 2:07 PM

संजय बोटकूलवार म्हणाले, हे जुन्या सरकारच्या वेळेतलं काम आहे. सरकार कोणतं होतं. त्यावरून हा वाद झाला. माजी आमदार विश्वास नांदेकर हे बोटकूलवार यांच्यावर तुटून पडले. पण, पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळं वाद निवडला.

Video Yavatmal | यवतमाळात उन्हासोबतच राजकीय वातावरण तापलं; वाढीव मोबदल्यावरून आंदोलन, माजी आमदार विद्यमान आमदारांवर धावले
यवतमाळात माजी आमदार विद्यमान आमदारांवर तुटून पडले
Image Credit source: tv 9
Follow us on

यवतमाळ : विदर्भात उन्हामुळं वातावरण तापलं आहे. त्यात आज आजी माजी आमदारांनी वाढीव मोबदल्यावरून यवतमाळात वातावरण आणखी गरम केलं. शिवसेनेची माजी आमदार हे भाजपच्या विद्यमान आमदारांवर अक्षरशः धावून गेले. शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर (Vishwas Nandekar) हे भाजप आमदार संजय बोडकूलवारच्या (Sanjay Bodkulwar) अंगावर धावले. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला. मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (Hatwanjali project) येथील प्रकल्पग्रस्त जमीन मोबदल्यासाठी आंदोलन करत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर व भाजपचे आमदार संजीव बोदकुलवार त्या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी सरकार कोणाचे होते. प्रकल्प मंजुरी वेळी यावरून दोघांमध्ये वाद झाला. सरकार विरोधात बोलायचं नाही असे सांगत त्यावेळी सरकार कोणाचे होते, हे तपास म्हणून दोघांमध्ये वाद झाला.

आंदोलकांच्या वाढीव मोबदल्यावरून वाद

हटवांजली प्रोजेक्स 2014 मंजूर झाला. वाढीव मोबादला मिळावा, यासाठी 2014 मध्ये 10 लोक कोर्टात गेले होते. प्रकल्पाचं बहुतेक काम पूर्ण केलं. पण, आंदोलक कोर्टात हरले. तरीही वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी हा वाद उभाळून आला. प्रकल्पग्रस्तांना रेडिरेकनरच्या भावाप्रमाणे रक्कम मिळते. ज्या भागात रेडिरेकनरचा भाव जास्त तिथं जास्त मोबदला मिळतो. हे प्रकल्पग्रस्त जास्त मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पाच्या धुऱ्यावर आंदोलन करत होते. संजय बोटकूलवार म्हणाले, हे जुन्या सरकारच्या वेळेतलं काम आहे. सरकार कोणतं होतं. त्यावरून हा वाद झाला. माजी आमदार विश्वास नांदेकर हे बोटकूलवार यांच्यावर तुटून पडले. पण, पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळं वाद निवडला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

आता या आंदोलकांच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यावेळी आजी-माजी आमदार तसेच आंदोलक एकत्र येतील. या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. पण, आज आंदोलनस्थळी दोन शिवसेना-भाजपचे दोन मोठे नेते एकमेकांवर तुटून पडले. त्यामुळं उन्हाबरोबर राजकीय वातावरणही तापले आहे.