Yavatmal MLA : आमदार ससाणे यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट, लिफाफ्यात दिलेल्या मदतीवरून रंगली चर्चा

| Updated on: Sep 06, 2022 | 7:57 PM

दुसरीकडे पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या दहीहांडीत कार्यक्रमात आमदार नामदेव ससाणे यांनी पूर्ण वेळ उपस्थिती लावली. पुढल्या वर्षी दहीहंडी बक्षिसाची रक्कम दोन लाख देण्याचे जाहीर केले.

Yavatmal MLA : आमदार ससाणे यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट, लिफाफ्यात दिलेल्या मदतीवरून रंगली चर्चा
आमदार ससाणे यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट
Follow us on

यवतमाळ : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणूर येथील शेतकऱ्यानं (farmers) स्वतःला संपविलं. चंपत नारायण जंगले असं या कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला (families) आमदार नामदेवराव ससाणे (MLA Namdevrao Sasane) यांनी भेट दिली. बंद लिफाफ्यामध्ये दोन हजारांची भेट दिली. लिफाफ्लात किती पैसे होते, यावर चर्चा झाली. या प्रकरणाचा गाजावाजा झाला. त्यानंतर आमदार ससाणे यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून पुन्हा तीन हजार पाठविले. अशाप्रकारे त्यांनी एकूण पाच हजार रुपयांची मदत दिली. पण, तेवढ्यात काय करू असा सवाल आता जंगले यांचे कुटुंबीय विचारत आहेत. एकीकंडं ससाणे यांनी दहीहंडी कार्यक्रमात दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले. दुसरीकडं आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना फक्त पाच हजार रुपयांची मदत दिली.

दहीहंडीसाठी दोन लाखांची मदत

दुसरीकडे पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या दहीहांडीत कार्यक्रमात आमदार नामदेव ससाणे यांनी पूर्ण वेळ उपस्थिती लावली. पुढल्या वर्षी दहीहंडी बक्षिसाची रक्कम दोन लाख देण्याचे जाहीर केले. मात्र, घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला मदतीसाठी हात आखडता का घेतला, अशी चर्चा होती. शेतीचा आधार गमावलेल्या व्यक्तीला मदत किती दिली. अवघी शेतीच उद्ध्वस्त झालेल्या त्या महिलेला ही आमदारांकडून आलेली दोन हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे. याबाबत गावकरी संताप व्यक्त करीत आहेत.

पाच हजार रुपये कुठं कुठं खर्च करू?

आमदारांच्या या कृतीचा उमरखेड मतदार संघात निषेध व्यक्त केला जात आहे.धुरपता जंगले व अंजनाबाई जंगले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आमदार साहेब आले होते. त्यांनी आधी दोन हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा तीन हजार रुपये पाठविले. त्यात मी दवाखान्याचा खर्च करू की, शेतीसाठी लागणारे औषध खरेदी करू. तेवढ्या पैशात काय होईल. मुलांच्या खाण्याघेण्याचा प्रश्न सोडवू की आणखी काही हे काही समजत नाही.

हे सुद्धा वाचा