AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झेडपी आणि पंचायत समितीत गुलाल कुणाचा? मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर; A टू Z डिटेल्स काय?

आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झेडपी आणि पंचायत समितीत गुलाल कुणाचा? मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर; A टू Z डिटेल्स काय?
Voting
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 23, 2025 | 6:32 PM
Share

राज्यात जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातज आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात. त्यानंतर या याद्या अंतिम करण्यात येतात.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

  1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
  2. पालघर – अनुसुसूचित जमाती
  3. रायगड- सर्वसाधारण
  4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
  6. नाशिक -सर्वसाधारण
  7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
  9. जळगांव – सर्वसाधारण
  10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
  11. पुणे -सर्वसाधारण
  12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  13. सांगली – सर्वसाधारण (महिला)
  14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
  16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
  17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  18. बीड – अनुसूचित जाती (महिला)
  19. हिंगोली -अनुसूचित जाती
  20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  22. लातूर – सर्वसाधारण (महिला)
  23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
  24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
  25. परभणी – अनुसूचित जाती
  26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
  27. बुलढाणा -सर्वसाधारण
  28. यवतमाळ सर्वसाधारण
  29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  30. वर्धा- अनुसूचित जाती
  31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
  33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
  34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा