कडक.... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

सध्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त….. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचाच बोलबाला आहे. एकदम कडक असा चित्रपट असल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. अभिनेता सुबोध भावेने साकारलेली डॉ काशिनाथ घाणेकर यांची भूमिका जबरदस्त आहे. अभिजीत देशपांडे यांनी काशिनाथ घाणेकर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन …

, कडक…. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

सध्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त….. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचाच बोलबाला आहे. एकदम कडक असा चित्रपट असल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. अभिनेता सुबोध भावेने साकारलेली डॉ काशिनाथ घाणेकर यांची भूमिका जबरदस्त आहे. अभिजीत देशपांडे यांनी काशिनाथ घाणेकर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता धुरी यांनी भूमिका साकारल्या आहेत.

डॉ. काशिनाथ घाणेकर या नटाचं आयुष्य खरोखरच चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यातील चढउतार दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी सुबोध भावेकरवी प्रेक्षकांसमोर आणला आहे. सुबोधने मोठ्या पडद्यावर डॉ. घाणेकर जिवंत उभे केले आहेत. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

काशिनाथ घाणेकर हे डॉक्टर होते, मात्र त्यांचं पहिलं प्रेम अभिनयावर होतं. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर डॉ. घाणेकर यांची जगण्याची उलाढाल बदलते. मात्र अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर पत्नी इरावती (नंदिता धुरी) डॉ. घाणेकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. हा सर्व प्रवास दिग्दर्शकाने जबरदस्त मांडला आहे.

सुबोधने काशिनाथ यांच्या नाटकातील सगळ्याच भूमिका उत्तम निभावल्या आहेत. लाल्या या व्यक्तिरेखेतील संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतो.

दुसरीकडे तगडे कलाकार असलेले सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमीत राघवन यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्या आहेत. पण त्यांनी त्या त्याच ताकदीने निभावल्या आहेत. इंटरव्हलपर्यंत चित्रपट वेग पकडतो पण शेवटी थोडा मंदावतो. शिवाय साठचं दशक दाखवताना थोडी गल्लत झाल्याचं जाणवतं.

बाकी सिनेमाचं कथानकच दमदार असल्याने अन्य बाबी फिक्या पडतात. चित्रपटातील संवाद, अभिनय जबरदस्त आहे. त्यामुळे हा सिनेमा पैसा वसूल आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *