AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा ‘संवाद’ यात्रेआधी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून ‘मुस्कटदाबी’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज विधानभवनावर धडकणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाने राज्याच्या विविध भागातून संवाद यात्रा सुरु केल्या आहेत. या संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने पोलिसांसह संपूर्ण प्रशासन व्यवस्था सतर्क झाली आहे. पोलिसांनी तर या संवाद यात्रेची एकप्रकारे मुस्कटदाबीच करण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक […]

मराठा 'संवाद' यात्रेआधी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून 'मुस्कटदाबी'
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज विधानभवनावर धडकणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाने राज्याच्या विविध भागातून संवाद यात्रा सुरु केल्या आहेत. या संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने पोलिसांसह संपूर्ण प्रशासन व्यवस्था सतर्क झाली आहे. पोलिसांनी तर या संवाद यात्रेची एकप्रकारे मुस्कटदाबीच करण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी मराठा समाजाचे कार्यकर्ते, मोर्चाचे समन्वयक यांची धरपकड सुरु केली आहे.

आज मुंबईत येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक व कार्यकर्त्यांची पोलिसांनी काल रात्रीपासूनच धरपकड सुरु केली आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे व मुंबईत पोलिसांनी समन्वयकांना स्थानबद्ध केल्याची माहिती राज्यभरात पसरत आहे. आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली असतानाही राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत, यासाठी पोलिसांचा ससेमिरा सुरु आहे.

मराठा नेते – अटक, पाळत, स्थानबद्ध

आज पहाटे दादरमधून माऊली पवार, संजीव भोर व अंकुश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेत माटुंगा पोलिस स्टेशनला नेले आहे. ठाण्याचे समन्वयक इंद्रजित निंबाळकर यांच्या घराबाहेरच पोलिसांनी पाळत ठेवली असून पोलिस स्टेशनला येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. कोल्हापुरात दहा समन्वयकांना ताब्यात घेतल्याने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर नाशिकमध्येही मराठा समाजात पोलिस कारवाईमुळे संतापाचे वातावरण आहे.

दसरा चौकाला पोलिस छावणीचं रुप

कोल्हापुरातील दसरा चौकाला पोलिस छावणीचं रुप आलं आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल मराठा कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने शहरात तणाव होता.

संबंधित बातम्या :

मराठा क्रांती ठोक मोर्चाने बीडमध्ये पुन्हा उपोषणास्त्र उगारलं!

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर अटकेत

मराठा आरक्षणावर सरकारकडून सरळ सरळ फसवणूक : शरद पवार

ओबीसी वि. मराठा चर्चा, मुख्यमंत्र्यांसमोर खुद्द छगन भुजबळ

मराठा आरक्षणावर हे तीन संभ्रम अजूनही कायम

या सात मंत्र्यांची समिती मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करणार!

मराठा आमदारांना सोडणार नाही, मराठा मोर्चाची धमकी

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.