मराठा क्रांती ठोक मोर्चाने बीडमध्ये पुन्हा उपोषणास्त्र उगारलं!

महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले आहे. याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या आंदोलन मागे घेतलं होतं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहील, असा इशारा ठोक मोर्चाने दिला आहे. …

मराठा क्रांती ठोक मोर्चाने बीडमध्ये पुन्हा उपोषणास्त्र उगारलं!

महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले आहे. याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या आंदोलन मागे घेतलं होतं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहील, असा इशारा ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गेल्या 27 दिवसांपासून परळीच्या तहसील कार्यालयाबाहेर हे आंदेलन सुरू होतं. या आंदोलनाआधी मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारला 100 दिवसांचे अल्टिमेटम दिलं होतं. मात्र, हे अल्टिमेटम दिल्यानंतर सरकारने आरक्षणाचे आश्वासन न पाळल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे.

याआधी झालेल्या ठोक मोर्च्याच्या वतीने तहसील कार्यालयाबाहेर 27 दिवस आंदोलन सुरु होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य करु, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाने हे आंदोलन मागे घेतले होते .

हे आश्वासन दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्याने, मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता पुन्हा आमरण उपोषण करुन आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *