मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर अटकेत

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (26 नोव्हेंबर) मुंबईत होणाऱ्या संवाद यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अटक करण्यात आली आहे. नगरच्या तोफखाना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. तसेच आणखी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. […]

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर अटकेत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:58 PM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (26 नोव्हेंबर) मुंबईत होणाऱ्या संवाद यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अटक करण्यात आली आहे.

नगरच्या तोफखाना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. तसेच आणखी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी या अगोदर मोर्चे काढले होते. मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे मराठा राज्य समन्वय समितीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र 26/11 च्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरता पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सदरचा मोर्चा रद्द करावा, अशी पण भूमिका मांडली होती. मात्र समितीने मोर्चा काढला जाईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरांमध्ये मराठा पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे आहे.

समन्वय समितीचे सदस्य संजीव भोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर 151 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें