मुंबई पाऊस LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

 रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाची सतंतधार आजही सुरु आहे. यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई पाऊस LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मुंबई : मुंबईत धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने आज दिवसभर उघडीप दिली. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं. मध्य रेल्वेची दिवसभर ठप्प झालेली वाहतूक अखेर संध्याकाळनंतर सुरु झाली.  पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात आज सुट्ट्या जाहीर केल्या होत्या.  मुंबईसह वसई-विरार, ठाणे-कल्याण, शहापूर या भागात दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाची सतंतधार आज सकाळपर्यंत सुरुच होती. या मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळनंतर हळूहळू मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली.

LIVE UPDATE

Picture

विस्कळीत झालेली मध्य रेल्वे पूर्वपदावर

02/07/2019,5:12PM
Picture

ठाण्यात 14 तासानंतर पहिली लोकल पोहोचली

ठाण्यात 14 तासानंतर पहिली लोकल पोहोचली, ठाण्याहून सीएसएमटीच्या दिशेने पहिली लोकल रवाना, लोकलमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी, ठाण्याहून निघालेली लोकल फक्त घाटकोपर आणि दादरला थांबणार

02/07/2019,3:30PM
Picture

नालासोपाऱ्यात पावसाची विश्रांती

दुपारचे 3 वाजून गेले तरी नालासोपाऱ्यात स्टेशन परिसर तुंबलेलाच, गुडगाभार पाण्यातून नागरिकांचं मार्गक्रमण, 2 तासापासून पावसाची विश्रांती

02/07/2019,3:24PM
Picture

पालघर जिल्ह्यात सरासरी 195 मिमी पाऊस

पालघर जिल्ह्यात दि. 2 जुलै रोजी मागील 24 तासात सरासरी 195.41 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 342 मिमी. पाऊस वसई तालुक्यात झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : वसई- 342 मिमी., वाडा- 125.94 मिमी., डहाणू- 162.55 मिमी., पालघर- 248.83 मिमी., जव्हार- 72.88 मिमी., मोखाडा- 50.75 मिमी., तलासरी- 136.25 मिमी. आणि विक्रमगड- 142.75 मिमी.

02/07/2019,3:15PM
Picture

मिरा रोडमध्ये शॉक लागून

मिरा रोड:- स्पाईस अॅण्ड राईस हॉटेलमध्ये शॉक लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला. मिरा रोडच्या प्लेजंट पार्कमधील घटना. वीरेंद्र भुईया आणि राजन दास अशी मृतांची नावं. रात्री जवळपास दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे हॉटेल आणि रोडवर पाणी साचलं होतं. पाण्यामुळे फ्रीज मध्ये शॉक उतरला होता आणि फ्रीज मध्ये उतरलेल्या शॉकमुळे दोघांचा मृत्यू झाला

02/07/2019,1:58PM
Picture

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत, चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत लोकल सेवा सुरु, तर बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंतही वाहतूक सुरळीत सुरु

02/07/2019,1:20PM
Picture

हार्बर रेल्वे अपडेट

मुंबईत पावसाची विश्रांती, हार्बर रेल्वे मात्र अद्याप ठप्प, पनवेल ते वाशी वाहतूक सुरु, मात्र सीएसएमटीहून मानखुर्द आणि मानखुर्द ते सीएसएमटी वाहतूक अद्याप ठप्प

02/07/2019,1:20PM
Picture

कल्याणच्या दिशेने 3 लोकल रवाना

मुंबईत पावसाची विश्रांती, मध्य रेल्वे दुपारी 2 नंतर लोकल सुरु करण्याची शक्यता, सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने 3 लोकल रवाना

02/07/2019,1:19PM
Picture

जगातील यंत्रणा सांगा, मुंबईत आणू – आदित्य ठाकरे

महापालिका या परिस्थितीत हतबल आहे. मुंबई तुंबली का? आदित्य ठाकरे म्हणतात असच समजा. या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही. अशी कुठली यंत्रणा असेल तर तुम्हीच मला सांगा, आपण मुंबईत आणू.. कलानगरला काही ठिकाणी खोदकामं सुरु आहेत. त्यामुळे कलानगर आणि मातोश्रीच्या आसपास पाणी तुंबलं. सगळेच मुंबईकर पावसात अडकले तसा मी ही अडकलो – आदित्य ठाकरे

02/07/2019,12:24PM
Picture

महापौर अखेर महापालिकेत पोहोचले

02/07/2019,11:38AM
Picture

पावसामुळे अनेक दुर्घटना - मुख्यमंत्री

02/07/2019,11:08AM
Picture

मुंबईतील पाऊस हा अपघात : संजय राऊत

02/07/2019,10:42AM
Picture

मुख्यमंत्री महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेत दाखल, आपत्कालिन विभागातून तुंबलेल्या मुंबईचा आढावा

02/07/2019,10:25AM

*टीव्ही 9 मराठी अलर्ट* *पाऊस विशेष* *www.tv9marathi.com*

 

*02/07/2019*  –  *सकाळी 10.15 मिनिटे*

 

  1. मुंबई आणि उपनगरात पावसाचा हाहा:कार, मालाडमध्ये भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू, 75 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली https://bit.ly/2J3PTIb

 

  1. पुण्यात सिंहगड कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू, जोरदार पाऊस अनेकांच्या जीवावार, जनजीवन विस्कळीत https://bit.ly/2J3PTIb

 

  1. कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू, वसई-विरार, नालासोपारा पाचव्या दिवशी पाण्याखाली, पावसाने मुंबईकरांचा जीव मेटाकुटीला https://bit.ly/2J3PTIb

 

  1. मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगरात सुट्ट्या जाहीर, घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द https://bit.ly/2J3PTIb

 

  1. मध्य रेल्वे ठप्प, हार्बर रेल्वे पाण्यात, पश्चिम रेल्वे रडत-कडत सुरु, ट्रॅकवरुन चालत चाकरमान्यांची पायपीट, 52 विमान उड्डाणं रद्द, 54 विमानं वळवली, आश्चर्यकारकरित्या हिंदमाता परिसर कोरडा ठाक https://bit.ly/2J3PTIb

 

  1. मुंबईचे मालक समजणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांची कडाडून टीका, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर पाण्याचं तळं, राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांच्या घरात पाणी शिरलं https://bit.ly/2J3PTIb

 

  1. मुंबईचा पाऊस अनेकांच्या जीवावार, मालाड सब वेजवळ पाण्यात स्कॉर्पिओ अडकल्याने दोघांचा गुदमरुन मृत्यू, 6 तासांनी काचा फोडून मृतदेह बाहेर काढले https://bit.ly/2J3PTIb

 

  1. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मराठी मालिकांचे शूट रद्द, अनेक सेटवर पाणी साचलं https://bit.ly/2J3PTIb

 

  1. येत्या 24 तासात मुंबईसह परिसरात पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली, मुंबईच्या समुद्रात दुपारीच्या 12 च्या सुमारास हाय टाईड, समुद्रकिनारी जाणं टाळा https://bit.ly/2J3PTIb
Picture

अनेक मालिकांचे शूट रद्द

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मराठी मालिकांचे शूट रद्द, अनेक सेटवर पाणी साचलं

02/07/2019,10:17AM
Picture

अनेक विमान उड्डाणं रद्द

मुंबईच्या पावसाचा विमानसेवेला फटका, 52 विमान उड्डाणं रद्द, 54 विमानं वळवली

02/07/2019,10:01AM
Picture

तुंबलेल्या मुंबईच्या मदतीला इंडियन नेव्ही

02/07/2019,9:57AM
Picture

चांदिवलीत रस्ता खचला

02/07/2019,9:52AM
Picture

चांदिवलीत रस्ता खचला

चांदिवली येथील संघर्ष नगरमध्ये रस्ता खचला, 3 कामगार अडकल्याची भीती, आजूबाजूच्या इमारती खाली केल्या

02/07/2019,9:48AM
Picture

आशिष शेलार मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागात

02/07/2019,9:44AM
Picture

मध्य रेल्वेच्या 156 लोकल ट्रेन रद्द,

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली, आतापर्यंत मध्य रेल्वेच्या जवळपास 156 लोकल ट्रेन रद्द, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती

02/07/2019,9:10AM
Picture

तीन जिल्ह्यात सुट्टी

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात सुट्टी, जोरदार पावसामुळे राज्य सरकारची घोषणा

02/07/2019,9:00AM
Picture

मुंबईकडे येणाऱ्या लोकल बंद

कल्याण ते ठाणे लोकल सुरु, मात्र ठाण्यावरुन सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल बंद, ठाणे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

02/07/2019,8:57AM
Picture

ठाणे, पालघरमध्ये कालपासून तुफान पाऊस, हवामान विभागाकडून पालघर, ठाण्यात रेड अर्लट जारी

02/07/2019,8:41AM
Picture

आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

02/07/2019,8:41AM
Picture

कल्याण ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या ठाणे स्टेशनवर रखडल्या,

02/07/2019,8:40AM
Picture

सायन ते माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रकवर पाणी, हजारो प्रवाशी रेल्वे ट्रकवर उतरले

02/07/2019,8:30AM
Picture

मुंबईतील अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द, मुंबईहून मनमाडला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द, प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात हाल

02/07/2019,8:24AM
Picture

रायगड : आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागोठणे शहरात पाणी शिरले, मध्यरात्रीच्या सुमारास घरात पाणी शिरल्याने नागरिक चिंतेत

02/07/2019,8:24AM
Picture

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

02/07/2019,8:23AM
Picture

पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळली, दुर्घटनेत 6 मजूरांचा जागीच मृत्यू, आणखी मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती

02/07/2019,7:57AM
Picture

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 3 जणांचा मृत्यू

02/07/2019,7:52AM
Picture

हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते वांद्रे, वाशी ते पनवेल वाहतूक सुरु, तर ट्रान्सहार्बर ठाणे-वाशी-पनवेल सुरु आहे - मध्य रेल्वे

02/07/2019,7:49AM
Picture

ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरात पाऊस, सीएसएमटी ते ठाणेपर्यंत रेल्वेसेवा ठप्प, सीएसएमटीपासून वाशीपर्यंत एकही लोकल धावणार नाही - सीपीआरओ सुनील उदासी यांची माहिती

02/07/2019,7:41AM
Picture

येत्या 4 दिवसात मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, मराठवाडा आणि विदर्भातही रेड अलर्ट जारी

02/07/2019,7:41AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *