नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये काँक्रीट रस्त्यावर डांबरीकरण

नवी मुंबई एपीएमसी व्यापार भवन आणि 'जे विंग'मध्ये असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये काँक्रीट रस्त्यावर डांबरीकरण

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी दाना मार्केट व्यापार भवनासमोर चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर सध्या डांबरीकरणाचं काम सुरु आहे. व्यापार भवन आणि ‘जे विंग’मध्ये असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण (Navi Mumbai APMC Market Road) करण्यात आलं आहे. मात्र टेंडरमध्ये एक आणि प्रत्यक्षात वेगळंच काम केलं जात असल्याचा आरोप होत आहे.

दाना मार्केटमध्ये 30 वर्षांपासून व्यापर करणाऱ्या लालजी भाई यांनी सांगितलं की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दाना मार्केट आणि मसाला मार्केटमध्ये काँक्रीट, डांबरीकरण आणि गटारांच्या कामासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दाना मार्केट आणि मसाला मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार आणि ट्रान्सपोर्टला मूलभूत सुविधा देण्यासाठी बाजार समितीतर्फे रस्त्याचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि गटारांची कामं सुरु आहेत. परंतु व्यापार भवनच्या समोर असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आलं आहे.

आधी आजारपणामुळे भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं ट्वीट

लालजी भाई यांच्या माहितीनुसार ‘दाना मार्केटमधून सगळे व्यापारी 100 कोटी रुपये एपीएमसीला सेस स्वरुपात देतात. मात्र मोबदल्यात आम्हाला काही सोयी सुविधा मिळत नाहीत. पाण्याची, गटारांची आणि रस्त्याची स्थिती एकदम वाईट आहे. मार्केटमध्ये पूर्ण देशातून अवजड वाहनं येत असल्यामुळे डांबरी रस्ते खराब होतात. म्हणून आम्ही सगळे व्यापारी बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते की मार्केटमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते पाहिजेत. परंतु दाना मार्केटमध्ये असलेल्या कनिष्ठ अभियंताने इथे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या बरोबर राहून इथे पहिल्यापासून असलेल्या काँक्रीट रस्त्यावर डांबर टाकला. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.’

दोन्ही मार्केटमध्ये बारा महिने झाले तरी 30 टक्केही काम पूर्ण झालं नाही. रस्त्यावर होणारा खर्च हा उघड उघड भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला जात आहे. या गोष्टीमध्ये बाजार समिती प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच मार्केट आहेत. यामध्ये मसाला मार्केट आणि दाना मार्केटमध्ये काही वर्षांपासून रस्ते, गटार आणि विविध प्रकारच्या समस्यांवर व्यापाऱ्यांकडून बाजार समितीला तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे बाजार समितीतर्फे दोन्ही मार्केटचं काँक्रीटीकरण, डांबर आणि गटारांची कामं करण्यासाठी टेंडर काढण्यात आली. पण दोन्ही मार्केटची टेंडर एकच कंत्राटदार B.J civil work ला मिळाली. काम सुरु होऊन बारा महिने झाले, मात्र फक्त चार ते पाच विंगमध्ये कामं झालेली आहेत. मुख्य काम अजूनही बाकी आहे. काँक्रीट रोडमध्ये अद्यापही काम चालू झालेलं नाही. या कामाला जेवढा उशीर होईल, तेवढीच त्या कामाची किंमत वाढेल त्यामुळे कंत्राटदारांच्या कामाच्या किमतीमध्ये वाढ होण्यासाठीच या कामाला अद्याप सुरुवात केली नसल्याचं बोललं जात आहे.

डांबरीकरणाच्या कामामध्ये (Navi Mumbai APMC Market Road) बिटूमिन कन्टेन्ट कमी वापरल्यामुळे रस्त्यांचा दर्जा तितकासा चांगला नसणार. कालांतराने या रस्त्यावर खड्डे पडणार वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे रस्ते लवकरच खराब होऊन त्यावर जागोजागी खड्डे पडणार. मग तोच कंत्राटदार हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा पैशांचा वापर करणार असंही काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *