आधी आजारपणामुळे भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं ट्वीट

पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

Pankaja Munde Tweets after BJP Meeting, आधी आजारपणामुळे भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं ट्वीट

मुंबई : आजारी असल्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला काल (सोमवार) अनुपस्थित होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट (Pankaja Munde Tweets after BJP Meeting) करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

“तब्येत ठीक नसल्यामुळे पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहिल्या असून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांमुळेच त्या गैरहजर राहिल्याचं बोललं जात होतं.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार आम्ही या विभागीय बैठकीला आलो असून पंकजा मुंडे नाराज नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार सुरेश धस, अक्षय मुंदडा, राजेंद्र म्हस्के यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना दिली. पंकजा मुंडे या 12 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करतील. पक्षांतर्गत बूथ बांधणी यावर बैठकीत चर्चा झाल्याचं यावेळी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी (Pankaja Munde Tweets after BJP Meeting) सांगितलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर भाजपने विभागवार आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे. औरंगाबादेत मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित राहिले होते.

भाजपला धक्का, पंकजा मुंडे मराठवाडा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वत: पंकजा मुंडे आणि आपण नाराज असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्याचप्रमाणे जळगावात झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागातील भाजपच्या बैठकीलाही खडसेंनी उशिरा हजेरी लावली होती. विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे (Pankaja Munde Tweets after BJP Meeting) यांच्या भेटीगाठी वाढल्याने नाराजीच्या चर्चांना ऊत आला होता.

पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांची नाराजी, त्यांच्यातील मतभेद आणि विधानसभा निवडणुकांमधील सत्तास्थापनेतील अपयश हे या विभागवार बैठकामागचे मूळ कारण आहे. आता भाजपला ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यात यश येणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *