AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला धक्का, पंकजा मुंडे मराठवाडा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत!

भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde not attend BJP meeting) या उपस्थित राहणार नाहीत. स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

भाजपला धक्का, पंकजा मुंडे मराठवाडा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत!
| Updated on: Dec 09, 2019 | 2:18 PM
Share

औरंगाबाद : भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde not attend BJP meeting) या उपस्थित राहणार नाहीत. स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. “पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांची तब्बेत ठीक नसून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे”, असं चंद्रकांत पाटील (Pankaja Munde not attend BJP meeting) यांनी सांगितलं.

महाराष्ट्र निवडणुकानंतर भाजपने विविध विभागात आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे. आज औरंगाबादेत मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित आहेत. मात्र आज सकाळपासूनच एकच चर्चा होती, ती म्हणजे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे या बैठकीला हजर राहणार की नाही.

पंकजा मुंडे या बैठकीला येणं अपेक्षित आहे, आणि त्या येतीलही, असा विश्वास सकाळीच हरीभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला होता. मात्र चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे या बैठकीला गैरहजर राहतील असं सांगितलं.

पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  स्वत: बद्दलची आणि पंकजांबद्दलची पक्षाविषयीची नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी भाजप कशी दूर करणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

भाजपच्या बैठका

विधानसभा निवडणुकांच्या कालावधीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीने निवडणूक रणनीतीवर अनेक महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने सत्तास्थापनेसाठी आवश्यक जनमताचा कौल देखील भाजपला दिला . मात्र सत्तास्थापनेसाठीचे भाजपचे प्रयत्न फसले आणि त्यानंतर आता पक्षांतर्गत हेवेदावे देखील बाहेर पडायला सुरुवात झाली. याचा परिणाम पक्षावर होऊ नये यासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपने राज्यात विभागवार बैठकांचा कार्यक्रम सुरू केला असून वरिष्ठ नेते या बैठकीत मार्गदर्शन करीत आहे. नुकतीच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राची बैठक झाली. आज मराठवाडा मग पश्चिम महाराष्ट्रात या बैठका होणार आहेत.

राज्यातील विभागवार बैठका हा पक्षांतर्गत प्रक्रियेचा भाग असल्याचं जरी भाजपकडून सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात कारण वेगळं असल्याचं बोललं जातं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना रेड कार्पेट अंथरूण काही ठिकाणी  नव्याने पक्षात आलेल्यांना भाजप नेतृत्वाने उमेदवारी दिली होती. मात्र यामुळे पक्षातील जुनेजाणते नेते नाराज होते आणि काही जागांवर बंडखोरी होऊन भाजपला अपेक्षेप्रमाणे यश देखील मिळाले नाही.

या सर्व बाबींचा विचार करून पक्षाला नवी उभारणी देण्यासाठी आता  नाराजांना  पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आयाराम त्यांच्या स्वगृही परतू नयेत, या करिता भाजप डॅमेज कंट्रोल करीत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पक्षातील  जुन्याजाणत्या नेत्यांची नाराजी, त्यांच्यातील मतभेद  आणि विधानसभा निवडणुकांमधील सत्ता स्थापनेतील अपयश हे या विभागवार बैठकामागचे मूळ कारण आहे. मात्र  यासोबत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पूर्वतयारी या विषयांवरदेखील चर्चा या बैठकांमधून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.