100 वर्षे जुनी कब्र खोदून काढली, महाराणीच्या ताजची अनोखी कहाणी

| Updated on: Sep 20, 2022 | 10:41 PM

317.4 कॅरेटचा हिरा ग्रेट कलीनन डायमंडमधून निघालेला दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया येथून हा हिरा सापडला. थॉमस कलीननच्या नावानं या हिऱ्याचं नाव ठेवण्यात आलं.

100 वर्षे जुनी कब्र खोदून काढली, महाराणीच्या ताजची अनोखी कहाणी
महाराणीच्या ताजची अनोखी कहाणी
Image Credit source: social media
Follow us on

महाराणी एलिजाबेथच्या डोक्यावरील ताज सजला. 2668 हिरे, 17 निलम, 11 पत्रे, 4 रुबी आणि 269 मोत्यांनी जडलेला ताज. याची अंदाजीत किंमत 454 कोटी रुपये म्हणजे 51 मिलीयन डॉलरपेक्षा जास्त आहे. ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयला कोट्यवधी लोकांनी साश्रुनयनांनी शेवटचा निरोप दिला. सोमवारी राजकीय सन्मानात महाराणीवर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम यात्रेत किमती ताज आणि दागिने त्यांच्यासोबत होते. त्यानंतर ते म्युझियममध्ये पाठविण्यात आले.

राणीच्या ताबूतवर सुंदर निलमनं जडलेला ताज ठेवलेला होता. दोन किलोपेक्षा जास्त वजनी इम्पिरीअल स्टेट क्राऊन कित्तेक वर्षांपासून या कुटुंबाची शान आहे.

सन्मान देण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. महाराणीच्या दादा जॉर्ज पंचमच्या अंत्ययात्रेतही हा ताज होता. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीपासून हा ताज या कुटुंबाची शान आहे.

1714 मध्ये या ताजला पुन्हा तयार करण्यात आले. 1838 मध्ये क्वीन व्हिक्टोरिया यांनी हा ताज परिधान केला. या ताजची कहाणी काही वेगळीच आहे.

या ताजच्या सर्वात वर नीलम आहे. या नीलमची कहाणी रोमांचक आहे. ताजमध्ये असलेला हा सर्वात जुना स्टोन आहे. हा निलम किंग एडवर्ड यांच्याकडं होता. किंग एडवर्डसमोर एक भिकारी आला होता.

त्याला देण्यासाठी राजाजवळ काहीचं नव्हते. त्यामुळं त्यानं नीलमसह आपली अंगुठी भिक दिली. त्यानंतर माहिती झालं की, तो भिकारी सेंट जॉन इवानगेलिस्ट होता. सेंट जॉननं ती अंगुठी परत राजाकडं पाठविली.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी 1066 ला एडवर्डसह हा नीलम कब्रस्थानात गाळला गेला. दाबला गेला. परंतु, 100 वर्षांनंतर त्यांची कब्र खोदण्यात आली. त्यानंतर नीलमची ही अंगुठी काढण्यात आली. त्यानंतर हा नीलम ताजवर लावण्यात आला.

317.4 कॅरेटचा हिरा ग्रेट कलीनन डायमंडमधून निघालेला दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया येथून हा हिरा सापडला. थॉमस कलीननच्या नावानं या हिऱ्याचं नाव ठेवण्यात आलं.

कलीनन हे खाण कंपनीचे अध्यक्ष होते. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत युद्ध झालं. वाद संपुष्ठात आणण्यासाठी 1907 मध्ये ब्रिटीश राजाला हा तोफा दिला गेला.

या हिऱ्याला कटिंग आणि पॉलिश करण्यासाठी तीन कारागिरांना 8 महिन्याचा कालावधी लागला होता. थॉमस कलीनन काठी घेऊन फिरत असताना दगड हटविल्यानंतर हा हिरा सापडला होता.