स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब फोडला, छातीत तुकडे घुसून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राजस्थानच्या बुंदीत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब फोडणाऱ्या १२ वर्षांच्या एका मुलाचा ग्लासाचे तुकडे छातीत घुसल्याने जागीत मृत्यू झाला आहे.

स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब फोडला, छातीत तुकडे घुसून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
ai photos ( Representative photograph)
| Updated on: Nov 10, 2026 | 4:51 PM

राजस्थानात दिवाळीच्या दिवसात अत्यंत दु:खदायक घटना घडली आहे. येथील बुंदी जिल्ह्यात दिवाळीच्या दुसऱ्या दिवसी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गोवर्धन पूजे दरम्यान येथे एका १२ वर्षांच्या मुलाचा सुतळी बॉम्ब फोडताना मृ्त्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ वर्षांचा साजन हा मुलगा घरा बाहेर एकटा फटाके फोडत होता. तेव्हा त्याने एक सुतळी बॉम्बच्या वातीला पेटवून त्यावर स्टीलचे ग्लास ठेवले. यावेळी फटाका फुटताना स्टीलचे ग्लासाचे तुकडे हवेत उडाले आणि या मुलाच्या छातीत घुसले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

Loading...

बुंदी सदर ठाणे हद्दीतील मंडी रोडवरील नानकपुरिया तिराहा जवळ एका घरातील एक १२ वर्षांचा मुलगा घराबाहेरील अंगणात फटाके फोडत होता, तेव्हा ही घटना घडली. या मुलाने सुतळी बॉम्बवर स्टीलचे ग्लास ठेवले, त्यावेळी झालेल्या फटाकाच्या विस्फोट इतका मोठा झाला की स्टीलच्या ग्लासाचे बारीक बारीक तुकडे हवेत उडाले. या धारदार तुकडे छातीत घुसून या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

फटाके फोडत असताना या मुलाचे आई-वडील घरात गोवर्धन पूजेची तयार करण्यात व्यस्त होते. त्यावेळी सुतळी बॉम्बचा स्फोट झाल्याने स्टीलच्या ग्लासाच्या ठीकऱ्या हवेत उडाल्या. या ग्लासाचे तुकडे छातीत घुसल्याने या मुलगा जबर जायबंदी होऊन घटनास्थळी कोसळला. तेथेच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि मुलाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टेम करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत देण्यात येईल असे बुंदी म्युनिसिपल काऊन्सिलचे अध्यक्ष भारत शर्मा यांनी सांगितले.लहान मुले फटाके फोडत असताना मोठ्या व्यक्तींनी तेथे हजर असणे किती गरजेचे असते हे या घटनेने अधोरेखीत केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us