Cyclone Asani in Bay of Bengal Live : असानी चक्रीवादळाचा कोकणाला किती धोका? वेगवान अपडेट

हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस राज्यात असानी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. 20 आणि 21 मार्चला बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Cyclone Asani in Bay of Bengal Live : असानी चक्रीवादळाचा कोकणाला किती धोका? वेगवान अपडेट
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 9:23 PM

हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस राज्यात असानी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. 20 आणि 21 मार्चला बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सतकर्तचे इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 21 मार्चपर्यंत हळूहळू चक्रीवादळात परावर्तीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.