25 वर्षीय मुलीचे दोन बॉयफ्रेंड, एक 50 वर्षांचा तर दुसरा…, अचानक आंब्याच्या बागेत अशा अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच…
25 वर्षीय तरुणाच्या निधनानंतर खळबळ माजली आहे. अचानक तिचा मृतदेह एका आंब्याच्या बागेत आढळला. याप्रकरणी पोलिसांना तरुणीच्या दोन्ही बॉयफ्रेंडला अटक केली असून, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

‘प्रेम आंधळं असतं…’, असं म्हणतात. पण सध्या घडत असलेल्या घटनांमुळे प्रेमावर खरंच विश्वास ठेवायचा की नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. आता देखील असंच काही झालं आहे. ज्यांमुळे खळबळ माजली आहे. 25 वर्षीय तरुणीचा मृतदेहा आंब्याच्या बागेत आढळला. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलं, तेव्हा कळलं की, तरुणीचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते आणि ती 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती. पण मृत्यूचं खरं कारण प्रेमाचं त्रिकूटच आहे का? याबद्दल कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या मृत्यूसाठी कुठेतरी दोघे देखील जबाबदार आहेत.. असं पोलिसांनी सागितलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथील कानपूर येथे घडली आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय तरुणीचे दोन पुरुषांसोबत अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. तरुणीच्या दोन बॉयफ्रेंड पैकी एक बॉयफ्रेंड 50 वर्षांचा होता आणि त्याचं नाव गोलू पांडे असं होतं. तर दुसऱ्या बॉयफ्रेंडचं नाव प्रांजल असं होतं आणि त्याचं वय 28 वर्ष आहे… अशी माहिती समोर येत आहे. तरुणीचे दोघांसोबत प्रेमसंबंध होते.
जबाबदारी कोण घेणार? एकाशी तरी लग्न कर…
गरोदर असल्याचं कळल्यानंतर तरुणी कायम चिंतेत असायची. तिने गोलू पांडे आणि प्रांजल दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, तिच्या अशा परिस्थितीसाठी दोघांपैकी एक जण जबाबदार आहे. तिने विनंती केली, आता या बाळाची जबाबदारी कोण घेणार? दोघांपैकी एकाने तरी लग्न करण्याची विनंती देखील किने केली. दोघांनी देखील तरुणीची साथ दिली नाही आणि माघार घेतली.
एक दिवस मिळाला मृतदेह
जसा – जसा प्रेग्नेंसीचा काळ जवळ येऊ लगाला, तरुणीचं पोट दिसू लागलं होतं. अशात गावात आणि घरात राहणं तरुणीसाठी प्रचंड कठीण झालं होतं. मानसिक तणाव आणि समाजाची भिती तिला सतत सतावत होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ती अचानक तिच्या घरातून गायब झाली. नातेवाईकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अशात दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका आंब्या बागेत आढळला…
पॉस्टमॉर्टममध्ये काय आलं समोर?
तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाल, हत्या की आत्महत्य हे मात्र अस्पष्टच आहे. तरुणीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या दोघा गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा आहे: त्या न जन्मलेल्या बाळाचा बाप कोण आहे. याबद्दल आता DNA रिपोर्ट समोर आल्यानंतर स्पष्ट होईल.