YouTube channels blocked : माहिती व प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; जाणून घ्या कारण

| Updated on: Aug 18, 2022 | 8:55 PM

आयटी कायदा 2021 अंतर्गत, माहिती व प्रसारण मंत्रालयाने 8 युट्यूब चॅनेल्स ब्लॉक केली आहेत. त्यामध्ये 7 भारतीय तर 1 पाकिस्तान आधारित चॅनेलचा समावेश आहे.

YouTube channels blocked : माहिती व प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; जाणून घ्या कारण
माहिती व प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई
Follow us on

माहिती व प्रसारण मंत्रालयाने 8 युट्यूब चॅनेल्स ब्लॉक (YouTube channels blocked) केली आहे. आयटी कायदा 2021 अंतर्गत, ही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये 7 भारतीय तर 1 पाकिस्तान- आधारित चॅनेलचाही समावेश आहे. भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित दुष्प्रचार प्रसार करणारे 8 यूट्यूब चॅनेल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) ब्लॉक केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या या 8 युट्यूब चॅनेलवरील दर्शकांची संख्या (Viewership) 114 कोटीपेक्षा जास्त होती आणि 85 लाखांहून अधिक सबस्क्रायबर बेस (Subscriber base) होता, असे समजते . ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि परदेशी राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध याबाबत या चॅनेलमधून दाखवण्यात आलेली माहिती ही खोटी आणि संवेदनशील असल्याचे आढळले’ असे माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने अशा अनेक चॅनेल्सवर कारवाई केली होती. एप्रिल 2022 मध्ये केंद्र सरकारने एकूण 22 चॅनेल्स ब्लॉक केली होती, त्यामध्ये 4 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सचाही समावेश होता.

कोणती चॅनेल्स केली ब्लॉक ?

1) लोकतंत्र टीव्ही
Views : 23,72,27,331 Subscribers :12.90 लाख

2) यू अँड व्ही टीव्ही ( U&V Tv)
Views :14,40,03,291 Subscribers :10.20 लाख

3) एएम रझवी ( AM Razvi)
Views :1,22,78,194 Subscribers :95,900

4)गौरवशाली पवन मिथिलांचल
Views :15,99,32,594 Subscribers : 7 लाख

5)SeeTop5TH
Views : 24,83,64,997 Subscribers :33.50 लाख

6)सरकारी अपडेट
Views : 70,41,723 Subscribers : 80,900

7) सब कुछ देखो
Views :32,86,03,227 Subscribers : 19.40 लाख

8) न्यूज की दुनिया ( News ki Duniya- Pakistan Based)
Views : 61,69,439 Subscribers : 97,000

यापूर्वीही सरकारने केली होती चॅनेल्स ब्लॉक –

केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत शेकडो युट्यूब चॅनेल्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्सविरोधा कारवाई करत, ती ब्लॉक केली आहेत. एप्रिल महिन्यात सरकारने 22 चॅनेल्स ब्लॉक केली होती. भारत विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी किंबहुना भारताची बदनामी करण्यासाठी वापरले जाणारे हे चॅनेल्स बंद करण्यासाठी आयटी नियम, 2021 चा वापर करण्यात आला असे माहिती आणि प्रसारण विभागाने स्पष्ट केले. आता सरकारने पुन्हा मोठी कारवाई करत आणखी 8 चॅनेल्स ब्लॉक केली आहेत.