टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..

एका घरातील टॉयलेट सीट खाली क्रोबा लपल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घरातील लोकांनी सापाचा आवाज येत असल्याने वन्य संरक्षकांना बोलवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
6-foot cobra was hiding under the toilet seat
| Updated on: Aug 31, 2026 | 12:06 AM

एका घरातील टॉयलेट सीटखाली ६ फूट लांबीचा कोब्रा लपल्याची थरकाप उडवणारी घटना गुरुग्रामच्या गढवाल कलान येथे उघडकीस आली आहे. या घरातून टॉयलेटमधून सापाच्या फुँत्कराचा आवाज येत होता. त्यामुळे संशय आल्याने घरातील लोकांनी वन्यजीव संरक्षकांना घरात बोलावले. त्यानंतर तपासणी केली असता टॉयलेट सीटच्या पोकळ भागातून आवाज येत असल्याने उघड झाले. त्यानंतर ही सीट तोडली त्यानंतर त्यातून कोब्रा बाहेर पडल्याची घटना उघडकीस आली आहे.

गुरुग्राममधील सायबर सिटी येथील गडोली कलान गावातील एका घरातील टॉयलेट सीटमधून सापाच्या फुत्कारल्यासारखा आवाज येत असल्याने घरातील लोक घाबरले होते. घरातील लोकांनी टॉयलेट नीट तपासले तरी साप दिसत नव्हता पण त्याचा आवाज येतच होता.अखेर काही केल्या साप काही सापडत नव्हता, त्यामुळे कुटुंब गोंधळले, अखेर त्यांनी या घटनेची माहिती वन्यजीव संरक्षक अनिल गंडास यांना दिली. त्यानंतर  वन्यजीव संरक्षक अनिल गंडास आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाथरूमची पाहणी केली.

टॉयलेट सीटची अधिक बारकाईने तपासणी केल्यावर, त्यांना सापाच्या फुत्काराचा हा आवाज अधिकच तीव्र ऐकू आला. त्यानंतर त्यांनी टॉयलेट सीट फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सीट फोडल्यानंतर आत  एका अत्यंत अरुंद जागेत चक्क कोब्रा लपलेला आढळला.  या सुमारे ६ फूट लांबीचा एक अत्यंत विषारी नाग (स्पेक्टॅकल कोब्रा) असल्याने पथकाने त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेरीस, त्या कोब्रा सापाची सुखरूप सुटका करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आणि घरातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Follow Us