
असे म्हणतात की प्रेम आणि युद्धात सर्व काही माफ असतं असे म्हणतात. पण, एक डॉन असा होता ज्याचा अंत त्याच्या प्रेमामुळेच झालेला आहे. कित्येक वर्ष पोलीस त्याच्या मागे होते. त्याने अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतला होते. तसेच त्याने मोठ्या मोठ्या मंत्र्यांना मारण्याची देखील सुपारी घेतली होती. या अंडरवर्ल्ड डॉनचा मृत्यू हा गोळ्या झाडून किंवा खून करुन झालेला नाही. तर त्याच्याच प्रेयसीने विश्वास घात केल्यामुळे झाला आहे. त्याचा शेवटचा फोन कॉल आणि प्रेयसीला भेटण्याची ओढ यामुळे त्याच्या मृत्यू झाला. आता तुम्ही विचार करत असाल की हा डॉन कोणत होता? त्याच्यासोबत नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…
पहलवान ते ‘पाताल लोक’चा बेताज बादशहा होण्याचा प्रवास
उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी जगतात ९० च्या दशकात श्रीप्रकाश शुक्ला हे नाव सिस्टमसाठी सर्वात मोठा डोकेदुखी ठरलं होतं. गोरखपुरातील एका साधारण शाळेच्या शिक्षकाच्या घरी जन्मलेला हा तरुण कधी कलमाच्या जोरावर भविष्य लिहिणारा होता, पण नशिबाने त्याला वेगळ्याच मार्गावर नेलं. कुस्ती आणि पहलवानीचा शौक त्याला दबंगाईकडे घेऊन गेला आणि चुकीच्या संगतीने गुन्हेगारीचा रस्ता दाखवला.
१८व्या वर्षी पहिला खून आणि नंतर गुन्ह्यांचा सिलसिला
श्रीप्रकाश शुक्लाने गुन्हेगारी जगतात पहिले पाऊल वयाच्या १८ व्या वर्षी टाकले. आपल्या बहिणीसोबत झालेल्या गैरव्यवहाराचा बदला घेण्यासाठी त्याने गोरखपुरात एका तरुणाची हत्या केली. या एका घटनेने त्याच्या आतल्या गुन्हेगाराला जागृत केले. त्यानंतर खून, अपहरण, रंगदारी आणि सुपारी खून असा सिलसिला सुरू झाला. हे सर्व इतक्या प्रमाणात सुरु झाले की पाहता पाहता तो यूपी अंडरवर्ल्डचा बादशहा बनला. त्या काळातील बाहुबली राजकारण्यांनीही त्याला भरपूर खतपाणी घातलं.
गाझियाबादची मुलगी आणि डॉनचा पहिला प्रेम
गुन्ह्यांच्या जगात नाव आणि पैसा कमावताना श्रीप्रकाश ऐषोआराम आणि विलासी जीवनाचा शौकीन झाला होता. याच काळात त्याच्या जीवनात गाझियाबादची एक तरुणी आली. गुन्हेगारी जगतात पाषाण हृदयाचा म्हणून ओळखला जाणारा शुक्ला पहिल्यांदाच प्रेमात पडला. त्या काळात मोबाइल फोन नवीनच आला होता. त्याने आपल्या प्रेयसीला महागडा मोबाइल दिला जेणेकरून ती प्रत्येक क्षण त्याच्याशी संपर्कात राहू शकेल. हाच मोबाइल फोन शेवटी त्याच्या मृत्यूचं साधन ठरला.
दिल्लीपर्यंत दहशत
श्रीप्रकाश शुक्लाच्या महत्वाकांक्षा अमर्याद होत्या. १९९७ मध्ये लखनऊत आमदार वीरेंद्र प्रताप शाहीची दिवसा हत्या आणि नंतर बिहारचे प्रभावशाली मंत्री बृज बिहारी प्रसाद यांची हत्या यामुळे तो देशातील ‘मोस्ट वॉन्टेड’ बनला. जेव्हा इंटेलिजन्सला माहिती मिळाली की, शुक्लाने तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची हत्या करण्याची सुपारी घेतली आहे तेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. यानंतर यूपी पोलिसांनी एसटीएफ (Special Task Force) ची स्थापना केली, ज्याचा एकमेव उद्देश श्रीप्रकाश शुक्लाचा अंत करणे होता.
तो शेवटचा कॉल आणि इंदिरापुरमची ती रक्तरंजित दुपार
एसटीएफकडे शुक्लाचे ताजे फोटो नव्हते आणि ठिकाणेही माहीत नव्हते. तो सतत सिम कार्ड बदलत असे. पोलिसांनी त्याच्या एकमेव कमकुवतपणा म्हणजे प्रेयसीच्या फोनवर नजर ठेवली. २२ सप्टेंबर १९९८ रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, शुक्ला नोएडाच्या एका पीसीओवरून आपल्या प्रेयसीला कॉल करत आहे आणि तिला भेटण्यासाठी गाझियाबादला जाणार आहे. एसटीएफने गाझियाबादच्या इंदिरापुरममधील प्रह्लादगढी परिसरात घेराबंदी केली. जशी शुक्लाची निळी सिएलो कार तेथे पोहोचली, पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. शुक्ला आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एसटीएफच्या गोळ्यांनी श्रीप्रकाश शुक्लाच्या छातीवर वार केला. तो डॉन, ज्याला संपूर्ण सरकार थरथरत होती, तो आपल्या प्रेयसीला शेवटचे भेटही शकला नाही.
प्रेमाने माणूस बनवले, प्रेमच मृत्यूचं कारण ठरले
ज्या डॉनला कायदा खूप काळ पकडू शकला नाही, तो आपल्या प्रेयसीला भेटण्याच्या इच्छेने समोर आला. मात्र, तिची शेवटची भेटही घेऊ शकला नाही. असे म्हटले जाते की, जर त्याने त्या दिवशी फोन केला नसता तर कदाचित कहाणी वेगळी असती. पण हेच त्याच्या निशाबात लिहिले होते… जिथे प्रेमाने त्याला माणूस बनवले आणि तेच प्रेम त्याच्या मृत्यूचं कारणही ठरले.