ऋणानुबंधाच्या तुरुंगात पडल्या गाठी, निर्दयीपणे खून करणारे वधू-वर लग्नाच्या बेडीत अडकले

दोघा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या या विवाहाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कायदा, कारावास, जेल आणि पॅरोल प्रक्रियेबाबत वादविवाद सुरू झाले आहेत. वसंत पंचमीला झालेला हा अनोखा विवाह देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

ऋणानुबंधाच्या तुरुंगात पडल्या गाठी, निर्दयीपणे खून करणारे वधू-वर लग्नाच्या बेडीत अडकले
ऋणानुबंधाच्या तुरुंगात पडल्या गाठी
| Updated on: Jan 24, 2026 | 8:21 PM

ते दोघे खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची ओळख सजा भोगत असताना खुल्या कारागृहात झाली. दररोजच्या भेटीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. एकमेकांसोबत आता जगायचे आणि मरायचे अशा आणाभाका त्यांनी घेतल्या. आणि अखेर हथकडी ऐवजी रेशमी बंधनात ते कायमचे गुंतले. पॅरोलवर सुटी घेऊन एका हॉटेलात या दोघांनी हिंदूधर्म रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघा कैद्यांच्या या विवाहाने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

राजस्थानच्या अलवरमध्ये वसंत पंचमीच्या दिनी झालेल्या एका अनोखा विवाहाची संपूर्ण देशात चर्चा आहे. हे लग्न कोणा सर्वसामान्य जोडप्याचे नाही तर दोन अशा व्यक्तींचे आहे ज्यांना वेगवेगळ्या हत्याकांडात आजीवन कारावासाची सजा झाली आहे. जयपुरातील ओपन जेलमध्ये बंदी असलेल्या पाली येथील प्रिया सेठ आणि अलवर जिल्ह्यातील बडौदामेव निवासी हनुमान चौधरी यांचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह झाला. दोघांची भेट तुरुंगात झाली आणि तेथेच त्यांच्या नात्यांची सुरुवात झाली.

जेलमध्ये प्रेम जुळले

प्रिया सेठ आणि हनुमान चौधरी या दोघांची जयपुरच्या ओपन जेलमध्ये सजा भोगताना भेट झाली. त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली. त्यानंतर हे नाते प्रेमात बदलले. सुमारे सहा महिन्यांपर्यंत दोघांच्या भेटी होत होत्या. त्यानंतर दोघांनी आपले दु:ख वाटून घेतले. आणि एकत्र जगण्याचा आणि मरण्याचा निर्णय घेतला.आधीच्या नात्यात धोका मिळाल्याने दोघांनी एकमेकांमध्ये आता आधार शोधला.

कोर्टाकडून पॅरोल, कुटुंबाची सहमती

लग्नासाठी दोघांनी कोर्टाकडे १५ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला. राजस्थान हायकोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा पॅरोल एडव्हायजरी कमेटीने दोघांचा अर्ज स्वीकारला. पॅरोल मिळाल्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने अलवर येथील निर्वाणा पॅलेस होटलमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार त्यांनी विवाह केला. या लग्नाला कुटुंबातील मोजके सदस्य आणि काही जवळचे नातेवाईक हजर होते.

दोन चर्चीत हत्याकांडं, पुन्हा चर्चेत सहभागी

या अनोख्या लग्नानंतर राजस्थानातील दोन मोठी आणि चर्चित हत्याकांडांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. वधू प्रिया सेठ ही जयपूरच्या दुष्यंत शर्मा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे.जर हनुमान चौधरी हा ऑक्टोबर २०१७ मध्ये अलवर येथे झालेल्या संतोष हत्याकांडाशी जोडलेला असून यात एका व्यक्ती आणि तिच्या चार मुलांना निर्दयीपणे ठार करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणांनी त्या-त्या काळी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.

दुष्यंत शर्मा हत्याकांडात प्रिया सेठची भूमिका

प्रिया सेठ हिच्यावर आरोप आहे की तिने डेटिंग ऐपद्वारे दिल्लीतील तरुण दुष्यंत शर्मा या प्रेमजाळ्यात फसवले होते. दुष्यंत हा एका श्रीमंत कुटुंबातील व्यावसायिक होता. तपासात उघड झाले की प्रिया हिने तिचा प्रेमी दीक्षांत कामरा आणि त्याचा मित्र लक्ष्य वालिया यांच्या मदतीने दुष्यंत याचे अपहरण केले. खंडणी उकळल्यानंतर २ मे २०१८ रोजी दुष्यंत याची हत्या करण्यात आली. मृतदेहास सुटकेसमध्ये भरुन डोंगरात फेकून देण्यात आले होते. या प्रकरणात कोर्टाने २४ नोव्हेंबर २०२३ ला प्रिया सेठ सह तिघा आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सोशल मीडियाद्वारे ठकवण्याचा आरोप

प्रिया सेठ सोशल मीडियाद्वारे श्रीमंत लोकांना फसवायची आणि त्यांच्याकडून खंडणी उकळायची. तिला महागडे कपडे, परफ्युम आणि विमानप्रवासाचा छंद होता. तिचा मासिक खर्च सुमारे दीड लाख होता. साल २०१२-१३ पासून अनैतिक कारवायात गुंतवलेली होती.

हनुमान चौधरी : संतोष हत्याकांड

हनुमान चौधरीचे नाव एका भयंकर हत्याकांडात गुंतलेले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये अलवर येथील शिवाजी पार्क परिसरात संतोष याच्या सांगण्यावरुन आरोपी हनुमान याने संतोष हीचा पती बनवारी आणि त्याच्या चार मुलांची निदर्यीपणे हत्या केली होती. त्यावेळी संतोष देखील तेथे हजर होती. त्यानंतर पोलिसांनी तपासात हनुमान, संतोष आणि अन्य आरोपींना अटक करुन कोर्टाने त्यांना जन्मठेप सुनावली.

देशभरात चर्चेचा विषय

दोघा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या या विवाहाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कायदा, कारावास, जेल आणि पॅरोल प्रक्रियेबाबत वादविवाद सुरू झाले आहेत. वसंत पंचमीला झालेला हा अनोखा विवाह केवळ राजस्थानात नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.