दिल्लीत पोलीसच असुरक्षित; पुन्हा झाला पोलिंसावर हल्ला, हल्ल्यात वाहतुक पोलिस जखमी

| Updated on: Jun 08, 2022 | 4:11 PM

मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने एक पुरुष आणि दोन महिला मोटारसायकलवरून येत होत्या. तर त्याच्या दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. त्यावरून तेथे कार्यावर असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांने त्यांना आडवले.

दिल्लीत पोलीसच असुरक्षित; पुन्हा झाला पोलिंसावर हल्ला, हल्ल्यात वाहतुक पोलिस जखमी
दिल्ली पोलिस
Image Credit source: tv9
Follow us on

दिल्ली : दिल्ली पोलिस (Delhi Police) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी ही ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी पोलिसांनी कोणतेही चुकी केलेली नाही. तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांना मारहाण झाली आहे. तसेच पोलिसांबरोबर गैरवर्तणूक (Misconduct with Police) करण्यात आली आहे. यासंदर्भात सध्या ANIच्या ट्वीटरवर यासंदर्भात व्हिडिओ टाकण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे. यामुळे दिल्लीत कायदा आहे की नाही असा प्रश्न लोक विचारत आहेत. तर याप्रकरणी आता त्या वाहन चालकावर आणि त्या मारहाण करणाऱ्या मुलांवर कोणती कारवाई करण्यात येत हे पहावं लागेल.

राजधानी दिल्लीत पोलिसांशी गैरवर्तन होण्याची प्रकरणे काही कमी नाहीत. आधीमधी अशी प्रकरणे समोर येत असतात. यावेळीही असे एक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने एक पुरुष आणि दोन महिला मोटारसायकलवरून येत होत्या. तर त्याच्या दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. त्यावरून तेथे कार्यावर असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांने त्यांना आडवले. तसेच हे वाहतुक कायद्याचे उल्ल्ंघन असल्याचे सांगितले. त्यावर गाडीवरून आलेल्या त्या तिघांनी वाहतूक पोलिसाशी बाचाबाची करण्यास सुरूवात केली.

दरम्यान तिघांनी मिळून पोलिसांशी बाचाबाची करताना त्याच्याशी गैरवर्तन करण्यास सुरूवात करत मारहाण केली. ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तीन पोलिसांनी इन्स्पेक्टरलाच केली मारहाण

याच्याआधीही दक्षिण दिल्ली परिसरात तीन पोलिसांनी दिल्ली वाहतूक पोलिसांच्या इन्स्पेक्टरला मारहाण केल्याचे समोर आले होते. वास्तविक, तीन पोलीस ज्या गाडीत बसले होते ती गाडी चुकीच्या बाजूला उभी होती. इन्स्पेक्टरने त्यांना अडवून तेथून गाडी काढण्यास सांगितल्यावर तिघांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की त्यांनी गाडीतून खाली उतरून इन्स्पेक्टरला मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महिलांनी उपनिरीक्षकाला मारहाण केली होती

तर दिल्लीतील रोहिणी येथे एका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका आणि हेमलता अशी आरोपींची नावे आहेत. वास्तविक महेश बर्वा नावाच्या व्यक्तीला दक्षिण रोहिणी पोलीस ठाण्यात काही प्रकरणाच्या तपासासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी दोन महिला पोलिस ठाण्यात आल्या. यादरम्यान त्याचा उपनिरीक्षकाशी वाद झाला. आणि त्या महिलांनी उपनिरीक्षकाला मारहाण केली आणि त्याचा गणवेशही फाडला.