AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत… त्या 13 सेकंदाच्या व्हिडीओमुळे खळबळ

एका जावयाने कोर्टात सासूशी पळून जाऊन लग्न केले. त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले. या लग्नाचा १३ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुटुंबीय आणि इतरांमध्ये खळबळ उडाली आहे.

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत... त्या 13 सेकंदाच्या व्हिडीओमुळे खळबळ
Mother in lawImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 4:56 PM
Share

एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जावयाने थेट स्वतःच्या सासूशीच लग्न केले आहे. जावई सासूवर इतका भाळला की, त्याने स्वतःच्या पत्नीलाही सोडले. सासूनेही आपल्या मुलीची पर्वा न करता जावयासोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. यानंतर १३ सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल करत सोशल मीडियावर लग्नाची माहिती शेअर केली. नातेवाईकांना याची माहिती मिळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. दुसरीकडे, लोकांनी या नात्यावर आक्षेप घेतला आणि कुटुंबाचा दबाव वाढल्यानंतर दोघेही पळून गेले. एक आई स्वतःच्याच मुलीचा संसार कसा काय उद्ध्वस्त करू शकते, असा संतप्त सवाल सोशल मीडियावर लोक विचारत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आरके यादव नावाच्या एका युझरने सासू आणि जावयाच्या कोर्ट मॅरेजचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर कमेंट करताना एका युझरने म्हटले आहे की, ‘कलियुगात काय-काय पाहावे लागत आहे.’ या प्रकरणावर संताप व्यक्त करत तो म्हणाला की, ‘अशा आईला आई म्हणवण्याचा कोणताही अधिकार नाही, तिने नात्यांना काळिमा फासला आहे.’ तर, मुश्ताक नावाच्या दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘आपला समाज दूषित झाला आहे. नात्यांची मर्यादा पूर्णपणे संपली आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणतेही नाते आता सुरक्षित राहिलेले नाही.’

सासू-जावयाचे लग्न

सध्या प्रत्येक जण या सासू-जावयाच्या अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा करत आहे. अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. तरुण आपल्या सासूच्या इतका प्रेमात पडला की, दोघांनीही न्यायालयात जाऊन गुपचूप लग्न केले. लग्नानंतर जेव्हा दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दोघांनीही हे लग्न समाजापासून लपवून ठेवण्याऐवजी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून जाहीर केले.

कुटुंबीयांना बसला मोठा धक्का

सोशल मीडियावर लग्नाची पोस्ट व्हायरल होताच कुटुंबीय आणि स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला. लोकांनी सांगितले की, जावईच आपल्या सासूला घरातून घेऊन गेला होता. यानंतर थेट त्यांच्या लग्नाची बातमीच समोर आली. व्हिडीओमध्ये दोघेही हे नवे नाते स्वीकारण्याचे आणि त्यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन करताना दिसले. लोकांचे असेही म्हणणे आहे की, या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. अखेर जावई आणि सासूने समाज आणि कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते घरातून बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे, तरुणाची पत्नी (सासूची मुलगी) आणि इतर कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी