कॉक्रोच जनता पार्टीत फूट ? अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रीया काय ?

अभिजीत दीपके यांच्या सीजेपीतील एक गट वेगळा झाला आहे. त्या गटाने अभिजीत दीपके यांच्यावर आरोप केला आहे. त्याला आता अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीत फूट ? अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रीया काय ?
Abhijeet Dipke
| Updated on: Sep 03, 2026 | 5:38 PM

कॉक्रोच जनता पार्टीत फुट पडली आहे. आता सीजेपीचा एक गट सीजेडी डेमोक्रेटिक आता मैदानात उतरला आहे. अहमदाबादच्या मनिष ब्रह्मभट्ट नावाच्या व्यक्तीने सीजेडी डेमोक्रेटिकची घोषणा केली आहे. तसेच सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दीपके यांच्यावर अनेक आरोप केले आहे.त्यांनी अभिजीत दीपके हे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. आता या आरोपांनी स्वत: अभिजीत दीपके यांनी उत्तर दिले आहे.

मनिष ब्रह्मभट्ट यांच्या आरोपावर आता अभिजीत दीपके यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की कधी महाराष्ट्राचे सीए म्हणतात की मी काँग्रेसची बी टीम आहे. काही लोक म्हणतात की मी आम आदमीची बी टीम आहे. मला वाटते की या सर्व लोकांनी एकत्र बसावे आणि डिसाईड करावे की आम्ही कोणाचे कोण आहोत. आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत.

मनीष ब्रह्मभट्ट यांनी काय केले आरोप ?

याच्या आधी मनीष ब्रह्मभट्ट म्हणजे न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना सांगितले की आम्ही कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रेटिकची सुरुवात केली आहे. याचे कारण कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांच्या रक्ताघामाने आंदोलन यशस्वी केले आहे. मात्र, यांनी केवळ आणि केवळ निवडक टीम बनवली आणि अरविंद केजरीवालची टीम बनवली आहे. ते पॉलिटिकल डील करु इच्छीत आहेत.

ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मुद्यांवर लढू इच्छीत नाहीत. केवळ केजरीवालच्या इशाऱ्यांवर भाजपाच्या विरोधी जे पक्ष आहेत ,त्यांचे हे समर्थन करत आहेत. यांच्या टीममध्ये आठ लोक आम आदमी पार्टीचे आहेत.शिवसेना, समाजवादी पार्टी, टीएमसी, आरजेडीने सर्मथन दिले आहे. यांच्या टीममध्ये कोणताही विद्यार्थी नाही.

केवळ एका पार्टीच्या विरोधात – मनीष ब्रह्मभट्ट

मनीष ब्रह्मभट्ट म्हणाले की मेरिटवाल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. आपमध्ये तर मेरिटच नाही. विना पॅरामिटरच्या टीम बनवत आहेत. केवळ केजरीवारच्या अजेंड्यांवर चालणार आणि केवळ एका पार्टीच्या विरोधात लढणार, तर मग देश समजत आहे. ती त्यांना वारंवार सांगितले की मात्र ते ऐकायला तयार नव्हते तेव्हा आमची टीम आम्ही तयार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही दिल्लीच्या नीट पेपर लीक नंतरच्या जंतरमंतर आंदोलनात सहभागी होतो असेही मनिष ब्रह्मभट्ट यांनी म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us