मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष
१९९४ मध्ये मराठा समाजाला आरक्षणापासून बाजूला ठेवण्याचं पाप झालं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. मंडल आयोगाचा दाखला देत विखेंनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय, असा पलटवार शरद पवारांनी केलाय. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जी गती मराठा आरक्षणासाठी मिळाली मला वाटतं यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ते काम […]
१९९४ मध्ये मराठा समाजाला आरक्षणापासून बाजूला ठेवण्याचं पाप झालं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. मंडल आयोगाचा दाखला देत विखेंनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय, असा पलटवार शरद पवारांनी केलाय. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जी गती मराठा आरक्षणासाठी मिळाली मला वाटतं यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ते काम केलं नाही.
मी नेहमी सांगतो की १९९४ साली जर हा निर्णय मंडल आयोगाच्या जर शिफारसी स्वीकारल्या तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री ९४ साली कोण होते. त्यावेळी मराठा समाजाचा अंतर्भाव जर त्यात केला असता तर हा पुढचा इतिहास घडला नसता. ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून माननीय देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला, १६% आरक्षण दिलं ते दुर्दैवाने मागच्या सरकारच्या विकास आघाडीत टिकले नाही. विखे पाटलांनी तुमच्यावरती नाव न घेता असं म्हणालेत की ९४ ठीक आहे. ९४ ला जर हे पाप झालं नसतं… ९४ पासून आजपर्यंत काय करताय? ९४ पासून… सहा वर्ष… पंचवीस वर्षे तुम्ही सत्तेतच आहेत.

