Plants on Roof: छतावर कुंड्या ठेवणं का मानलं जातं अशुभ! वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात, प्रत्येक वस्तूंबाबत नियम सांगितले गेले आहेत. कोणती वस्तू कुठे ठेवायची? आणि त्याचा काय परिणाम होतो? यावर प्रकार टाकला गेला आहे. त्यामुळे वस्तू ठेवताना वास्तुशास्त्र मानणारे काळजी घेतात. असाच नियम छतावरील कुंड्याबाबत आहे.

वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं किंवा त्या पद्धतीने वस्तूंची मांडणी केली तर सकारात्मक परिणाम होतो, असं मानणारा एक वर्ग आहे. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगितलं गेलं आहे. कोणती वस्तू कुठे ठेवायची आणि त्याचा काय प्रभाव पडणार याबाबत सांगितलं आहे. वस्तुंची मांडणी करताना त्याकडे कानाडोळा तर नकारात्मक प्रभाव किंवा अडचणी येतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे वस्तुंची मांडणी करताना त्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, अनेक सकारात्मक वस्तुंबाबत सांगितलं गेलं. यात काही मनी प्लांट आणि जेड प्लांटसारख्या शुभ रोपांचा उल्लेख केला आहे. यासह काही रोपं घरी असणं शुभ मानलं गेलं आहे. पण रोप ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा छतावर कुंड्या ठेवायच्या की नाही याबाबत संभ्रम असतो. असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
छतावर कुंड्या ठेवायच्या की नाही?
वास्तुशास्त्रानुसार, छतावर रोपं ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. खासकरून कुंड्या ठेवण्याबाबत नियम सांगितला गेला आहे. घराचं छत सुंदर दिसावं म्हणून अनेक जण घराच्या छतावर कुंड्या ठेवतात. अनेक जण रूफ गार्डन करतात. पण वास्तुशास्त्रानुसार, छतावर कुंड्या ठेवण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. जर त्याबाबातचे नियम पाळले गेले नाही तर सकारात्मक उर्जेत अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणामन घरातील व्यक्ती आणि प्रगतीवर पडू शकतो. कारण घराचा छताचा संबंध राहु ग्रहाशी जोडला गेला आहे. तर हिरवीगार रोपं बुध ग्रहाशी निगडीत आहेत. त्यामुळे बुध आणि राहु ग्रह एकत्र आले तर ऊर्जा असंतुलित होऊ शकते.
पूर्ण छतावर रूफ गार्डन केलं तर चालेल का?
वास्तुशास्त्रानुसार, छत हिरवंगार राखण्यासाठी अनेक जण जास्तीत जास्त कुंड्या लावतात. पण कुंड्यांचं प्रमाण कमी ठेवूनही छत हिरवंगार ठेवू शकता. जर छतावर कुंड्या ठेवण्याची इच्छा असेल तर पश्चिम दिशेस ठेवणं योग्य ठरेल. तर छताचा उर्वरित भाग मोकळा ठेवावा. खासकरून उत्तर आणि पूर्व दिशा मोकळी ठेवणं गरजेचं आहे. जर या भागात जास्त झाडे किंवा जड वस्तू ठेवल्याने घरातील सकारात्मक उर्जेत अडथळा निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक प्रगती, शिक्षण आणि नवीन संधींमध्ये अडचणी येऊ शकतात. इतकंच काय तर झाडावर वाळलेली, कोमजलेली झाडं ठेवू नयेत. त्याचाही नकारात्मक प्रभाव पडतो.
