‘विषय- जोडे चोरी गेल्या बाबत…’ पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, दोन राज्यांची पोलीस शोधतेय चोरीला गेलेले जोडे

| Updated on: Nov 11, 2022 | 3:34 PM

कोण कोणत्या गोष्टीची तक्रार दाखल करेल याचा नेम नाही. एका पट्ठ्याने चक्क जोडे चोरीला गेले म्हणून पोलिसात तक्रार दिली आहे.

विषय- जोडे चोरी गेल्या बाबत... पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, दोन राज्यांची पोलीस शोधतेय चोरीला गेलेले जोडे
भारतीय रेल्वे
Image Credit source: Social Media
Follow us on

मुझफ्फरपूर,  बिहारचा (Bihar) एक मुलगा ट्रेनने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला झोप लागली पण जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचे जोडे चोरीला गेल्याचे समजले. त्याने ट्रेनमध्ये बराच वेळ शोधाशोध केली पण ते काही सापडले नाहीत. यानंतर त्याने थेट ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल केली. यासोबतच लेखी तक्रारही दिली,  या तक्रारीची (shoes stolen FIR) सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने ट्रेनमधून बूट चोरीला गेल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. राहुल कुमार झा असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. जो सीतामढीचा रहिवासी आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याचे चोरोला गेलेले जोडे शोधायला सुरवात केली आहे. तर दुसरीकडे राहुलने दिलेल्या लेखी तक्रारीची जोरदार चर्चा होत  आहे. त्याने तक्रारीत लिहिले आहे की,

विषय- जोडे चोरीला गेल्याच्या संदर्भात,…
सर,  माझे नाव राहुल कुमार झा आहे. वय २३ वर्षे वडील- अजय कुमार झा, गाव बलगाव दक्षिण, थाना बाजपट्टी जिल्हा सीतामढी येथील रहिवासी आहे. मी 28.10.22 रोजी अंबाला कॅंट ते मुझफ्फरपूर जंक्शनला ट्रेन क्रमांक 04652 च्या B-4 बर्थ क्रमांक-51 मध्ये प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान, मी माझ्या बर्थवर झोपलो होतो जेव्हा ट्रेन काही वेळाने सकाळी 12 वाजता (29.10.22) मुरादाबाद जंक्शनवरून निघाली. मला जाग आली तेव्हा मला दिसले की माझ्या बर्थखाली माझे जोडे नाही.

हे सुद्धा वाचा

शूजचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
कॅम्पस मॅक्सीकोचा होता (रनिंग शूज साइज-9 यूके/इंडिया कलर निळा). अज्ञात व्यक्तीने चोरी केली. त्यामुळे सर कृपया योग्य ती कारवाई करावी ही विनंती. या संदर्भात मी रेल्वे विभागाकडे तक्रार केली. ज्याचा संदर्भ क्रमांक 2022-10290-1991 आहे
तुमचा विश्वासू
राहुल कुमार झा

या तक्रारीवर रेल्वे स्टेशन पोलिसांचे स्टेशन हाउस ऑफिसर दिनेश कुमार साहू यांनी सांगितले की, राहुल कुमार झा नावाच्या प्रवाशाच्या वतीने बूट चोरीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुटांचा शोध घेऊन चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन राज्यांचे पोलीस शोधत आहेत जोडे

विशेष म्हणजे तक्रारीनंतर दोन राज्यांचे (यूपी आणि बिहार) पोलीस चालत्या ट्रेनमधून चोरीला गेलेल्या जोड्यांचा शोध घेत आहेत. मात्र, चोरीला गेलेल्या जोड्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.