Aadhaar Card: आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, माहिती मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारचे मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील कोट्यावधी लोकांना दिलासा मिळाला आहे.

Aadhaar Card: आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, माहिती मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली
आधार कार्ड
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 15, 2025 | 3:08 PM

आधार कार्ड हे असे कागदपत्र आहे जे बँकेत, सरकारी कार्यालयांसह बहुतांशी ठिकाणी वापरले जाते. अशातच आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारचे मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील कोट्यावधी लोकांना दिलासा मिळाला आहे. आधार मोफत अपडेट करण्याची नवी तारीख काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.

आधार अपडेट करण्याची मुदत एका वर्षाने वाढवली

UIDAI ने X वर एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. UIDAI ने म्हटले की, “लाखो आधार कार्ड धारकांना फायदा व्हावा यासाठी UIDAI ने मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपडेट सुविधा 14 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. UIDAI लोकांना त्यांच्या आधारमध्ये महत्वाची माहिती अपडेट करण्याची विनंती करत आहे.”

कोणती माहिती अपडेट करता येणार?

UIDAI ने ज्या लोकांना 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड मिळाले होते आणि तेव्हापासून त्यांनी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत, त्यांना आधार रेकॉर्ड अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या ज्या लोकांचे नाव, पत्ता किंवा इतर तपशील बदलले आहेत त्यांनी आपली नवी माहिती अपडेट करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल नंबर किंवा बायोमेट्रिक्स कसे अपडेट करायचे?

तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल, बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट, आयरिस) किंवा फोटो अपडेट करायचा असल्यास तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी/अपडेट केंद्राला भेट द्यावी लागेल आणि संबंधित माहिती अपडेट करावी लागेल. मोफत कागदपत्र अपडेट सेवा फक्त myAadhaar पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता आधार कार्ड 14 जून 2026 पर्यंत अपडेट करता येणार आहे. या अंतिम मुदतीनंतर आधार कार्ड अपलोड करण्यासाठी शुल्क भरावे लागू होऊ शकते.