नरेंद्र मोदी यांच्या हाती भगवा ब्रश, अन् यांनी तर बादलीच ओतली, केजरीवालांच्या सिक्सरची चर्चाच चर्चा!

| Updated on: Oct 28, 2022 | 12:23 PM

हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न यापूर्वीही काँग्रेसने केले आहेत. पण केजरीवालांनी लगावलेल्या सिक्सरची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.

नरेंद्र मोदी यांच्या हाती भगवा ब्रश, अन् यांनी तर बादलीच ओतली, केजरीवालांच्या सिक्सरची चर्चाच चर्चा!
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एका भिंतीला भगवा रंग देण्यात मग्न आहेत अन् अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी हळूच मागे येऊन ती भगव्या (Bhagava) रंगाची अख्खी बादलीच स्वतःच्या अंगावर ओतून घ्यावी… काय भन्नाट डावपेच… काय चपखल चित्रं रेखाटलंय.. सध्याराजकारणावर च्या (Indian politics)… अशाच प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. मोदी-केजरीवाल यांच्या कार्टूनवर आणि केजरीवालांच्या डावपेचांवरही… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या अजब मागणीनंतर तर देशात तुफ्फान चर्चा सुरु आहे.

देशातील राजकारणावर सोशल मिडियावर व्हायरल होणारं एक कार्टून

अरविंद केजरीवाल यांनी भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींजींसोबत गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी केली. त्यातच आणखी पुढचा टप्पा म्हणजे आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रच लिहिलंय.

75 वर्षानंतरही भारत विकसनशील आणि गरीब देशांमध्ये गणला जातो. ही गरीबी हटवण्यासाठी देशातील लोकांनी अखंड मेहनत केली पाहिजे. यासोबतच देवाचा आशीर्वादही असावा, म्हणून नोटांवर देवी-देवतांचे फोटो हवेत, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काल पत्रकार परिषदेत मागणी केल्यानंतर याला जनतेतून प्रचंड समर्थन मिळतेय, असंही केजरीवाल म्हणालेत.

वर्षानुवर्षांपासून हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपला आपने दिलेल्या आव्हानानं अवघा देश ढवळून निघालाय. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक वक्तव्य केलं अन् राजकारणातले बडे नेते तर सोडा रणनीतीकारांच्याही तोंडचं पाणी पळालंय.

हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक करण्याचे प्रयत्न यापूर्वी काँग्रेसनेही केले आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधींनी अनेक मंदिरात दर्शनाला गेलेत. त्यानंतर काँग्रेसवरही हिंदुत्वाचा मुद्दा चोरण्याचे आरोप झाले. पण आता तर केजरीवाल यांनी या स्पर्धेत सिक्सरच मारल्याचं चित्र आहे.

एकूणच, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मतं मिळवण्यासाठी वापरलेला हा फंडा कितपत कामी येईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.