AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोके’ नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?

बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

'खोके' नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2022 | 11:00 AM
Share

स्वप्निल उमप, अमरावतीः खोके घेऊन सत्तेत आले, हा आरोप शिंदे सरकारला (CM Eknath Shinde) स्वस्थ बसू देत नाहीये. तर मित्रपक्ष भाजपनेच आरोप केल्यामुळे शिंदे गटावर मोठं संकट कोसळलंय. भाजपचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी खोक्यांचे आरोप केल्याने खवळलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही आता थेट आव्हान दिलंय. खोके घेतल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच म्हटलंय. यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. या नाट्यात गुरुवारी रात्री बच्चू कडू तातडीने मुंबईला रवाना झालेत.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मुंबईच्या दरबारात म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्यासमोर सोडवला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी मध्यस्थी करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ही बंडखोरी करण्यासाठी खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप वारंवार केला जातोय.

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तर हा आरोप होतोच आहे. शिवाय आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनीही असाच आरोप केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र पहिल्या टप्प्यात ते न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचलं. मी गुवाहटीला जाणारा आमदार नाही, पैशांसाठी धावत नाही, असं वक्तव्य केलं.

त्यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद वाढत गेले. बुधवारी बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेत, या आरोपांनाच आव्हान दिलंय. 1 नोव्हेंबर पर्यंत खोके घेतल्याचा आरोप सिद्ध करा, असा इशारा त्यांनी दिलाय. सिद्ध नाही झालं तर हा आरोप कायमचा मिटवता येईल, असंही ते म्हणालेत.

पत्रकार परिषद घेतल्यानंतर गुरुवारी रात्रीतूनच आमदार बच्चू कडू मुंबईत रवाना झाले आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शिंदे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

आता बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.