AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातल्या टॉप श्रीमंतांना मोठा फटका, कालच्या घडामोडी इंटरेस्टिंग

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची नेटवर्थ 1.55 अब्ज डॉलर तर वॉरेन बफेट यांची नेटवर्थ 19.9 कोटी डॉलरने कमी झाली.

जगातल्या टॉप श्रीमंतांना मोठा फटका, कालच्या घडामोडी इंटरेस्टिंग
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2022 | 10:07 AM
Share

नवी दिल्लीः अमेरिकेच्या शेअर बाजारात (Share Market) बुधवारी मोठी घसरण झाली. यामुळे टॉप टेन श्रीमंतांना (Richest) मोठी झळ सोसावी लागली. या श्रीमंतांची नेटवर्थ 27.54 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.27 लाख कोटी रुपयांनी घसरली. अॅमेझॉनचे जेफ बेजोस (Jeff Bezos) यांची नेटवर्क बुधवारी 4.49 अब्ज डॉलरने घसरली. ते तिसऱ्या क्रमांकावर आले.

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या मते, बेजोस यांची नेटवर्थ 139 अब्ज डॉलर झाली. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 53.7 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.

फ्रान्सचे व्यावसायिक बर्नार्ड आरनॉल्ट हे जगातील श्रींमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. बुधवारी त्यांची संपत्ती 2.11 अब्ज डॉलरने वाढून 145 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. या वर्षी त्यांची नेटवर्थ 33.1 अब्ज डॉलरने घसरली.

जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांची संपत्ती बुधवारी 1.55अब्ज डॉलरने वाढली. ती 211 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. तर टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ यांची संपत्ती या वर्षी 58.9 अब्ज डॉलरने घसरली.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची नेटवर्थ 1.55 अब्ज डॉलर तर वॉरेन बफेट यांची नेटवर्थ 19.9 कोटी डॉलरने कमी झाली. लॅरी पेज यांची संपत्ती 7.66 अब्ज डॉलर, सर्गेई ब्रिन यांची 7.26 अब्ज डॉलर तर स्टीव्ह बामर यांची नेटवर्थ 61.5 अब्ज डॉलरची घसरण झाली.

बुधवारी दिवाळी पाडव्याच्या दिवशी भारतीय शेअर बाजार बंद होता. त्यामुळे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये बदल झाला नाही. मात्र अंबानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर पोहोचले. तर बामर हे 11 व्या स्थानावर पोहोचले.

मार्केट कॅपनुसार, भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती83.5 अब्ज डॉलर आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 6.50अब्ज डॉलर्सची घट झाली. तर अदानी 122 अब्ज डॉलरसह श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.