पोलिस मला कधीही उचलू शकतात, दिल्लीत घडामोडींना वेग, अभिजीत दिपके यांनी रात्री उशीरा..

कॉकरोच जनता पार्टी आज दिल्लीत तिरंगा फडकवणार आहे. त्यांच्या प्रमुख नेत्यांना तिरंगा फडकवल्याने पोलिसांनी जेलमध्ये टाकल्याचा आरोप सीजेपीचा आहे. त्यातच अभिजीत दिपके यांच्याकडून अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली आहेत.

पोलिस मला कधीही उचलू शकतात, दिल्लीत घडामोडींना वेग, अभिजीत दिपके यांनी रात्री उशीरा..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 16, 2026 | 8:22 AM

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मोठा दावा केला. अभिजीत दिपके यांनी दावा करत म्हटले की, दिल्ली पोलिस कोणत्याही क्षणी त्यांना अटक करू शकते. यासोबतच त्यांनी म्हटले की, इंटेलिजेंस ब्युरो आणि दिल्ली पोलिस त्यांची हेरगिरी करत आहेत. आज कनॉट प्लेसमध्ये सीपेजीने तिरंगा मोर्चाचे आयोजन केले. ज्याचा परवानगी अगोदरच कोर्टाकडून नाकारण्यात आली. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सध्या मी ज्या घरी आहे. तिथे चारही बाजूने पोलिस आणि आयबीचे लोक आहेत. मी ज्यावेळी बाहेर पडतो, त्यावेळी नंबर नसलेल्या दुचाकी फिरताना दिसत आहेत. मी ज्यावेळी खाली आलो त्यावेळी आयबी आणि पोलिसवाले चक्कर मारताना दिसले. हेच नाही तर ते वॉचमॅनसोबत बोलतानाही दिसले. ते त्यांच्याकडून अपडेट घेत आहेत. पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आज रात्री किंवा तिरंगा मोर्चावेळी दिल्ली पोलिस मला ताब्यात घेऊ शकतात.

अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, मी अशा गोष्टींना अजिबात घाबरत नाही किंवा घाबरणार नाही. तिरंगा फडकवल्याने जेलमध्ये जावे लागत असेल तर मी तात्काळ तयार आहे. पहिल्यांदा आम्ही 10 ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलन पुकारले. त्यावेळी पूर्ण दिल्ली बंद करण्यात आली. इंटरनेच, रेल्वे बस सर्वकारी बंद करण्यात आले. बॅरिकेड्स लावण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये फोर्स बोलवण्यात आली.

Loading...

यादरम्यान सीजेपीने आरोप करत म्हटले की, तिरंगा आम्हाला फडकू दिले जात नाहीये. आम्ही 100 ठिकाणी तिरंगा फडकवणार आहोत, मग तुम्ही 100 ठिकाणे बंद करा. उद्या जर कॉकरोच जनता पार्टी जाऊन नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत तिरंगा फडकवणार असेल तर तुम्ही रॅली रद्द करणार आहात का?

आज दिल्लीत कनॉट प्लेसवर कॉकरोच जनता पार्टीकडून तिरंगा फडकवला जाणार आहे. त्यातच मोठ्या अपडेट पुढे येत आहेत. अभिजीत दिपके यांच्याकडून मोठा आणि गंभीर आरोप करण्यात आला. दिल्लीतील आजच्या घडामोडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सीजेपी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us