मोठी बातमी! अभिजीत दिपकेंकडून मोठी घोषणा, पुन्हा वातावरण तापणार, सरकारचं टेन्शन वाढलं
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर आता अभिजीत दिपके यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. राजधानी दिल्लीमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला होता, दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दिल्लीचं जंतर -मंतर मैदान आता आंदोलनासाठी बंद करण्यात आलं आहे. या परिसरात जमावबंदी देखील लागू आहे. मात्र असं असताना देखील कॉकरोच जनता पार्टीचे नेते सैरभ दास, आशुतोष रांका आणि अजिक्य शिंदे हे तिघे आपल्या काही मित्रांसोबत या परिसरात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता सैरभ दास, आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेच्या विरोधात पुन्हा एकदा अभिजीत दिपके यांच्याकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेच्या विरोधात लेहरा दो तिरंगा मार्चची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा असं आवाहान अभिजीत दिपके यांच्यावतीने करण्यात आलं आहे. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता कनॉट प्लेस परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान अभिजीत दिपके यांच्या या नव्या घोषणेमुळे आता पुन्हा एकदा दिल्लीत वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सतात्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आपल्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन देखील करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेकांना ताब्यात देखील घेतलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे.
