अभिजीत दिपके यांना जवळच्याच लोकांनी दिला झटका, ज्याची भीती तेच घडले..
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यातच सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले. सीजेपीने गंभीर आरोप केले. सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली. आता अभिजीत दीपके यांच्याकडून मोठे आरोप केले.

कॉकरोच जनता पार्टी शांती -शांती आणि गांधी-गांधी बोलत आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. हिंसा नसलेले आंदोलन करण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात आहे. अभिजीत दिपके यांना त्यांच्या विश्वासू लोकांकडूनच मोठा धक्का देण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनात स्टेजवर दिसणारी नेहा बोरा आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी असे काही म्हटले की, सीजेपीला वारंवार त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांनी सीजेपीला मोठा धक्का दिला. हा झटका इतका जास्त भयंकर होता की, अभिजीत दिपके यांना मध्यरात्री पत्रकार परिषद घ्यावी लागली. प्रशांत भूषण यांचे नाव न घेता अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, आपल्यााल अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे आहे.
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, आपल्या या आंदोलनाच्या मागचा उद्देश अजिबात सत्ता परिवर्तन नाही. भूषण यांनी स्पष्ट म्हटले होते की, आम्हाला सत्ता परिवर्तन हवे आहे. या लढाईने सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रशांत भूषण यांचे हे बोलणे ऐकून सीजेपीने घेराबंदी सुरू केली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले. रात्री उशीरा सीजेपीची कायदेशीर सल्लागार रत्ना सिंहने स्पष्ट केले की, त्यांची मागणी सत्ता परिवर्तन नाहीये.
त्यांची मुख्य मागणी फक्त निवडणूक आयुक्तांना बदलण्याची आहे आणि त्याकरिता त्यांची लढाई सुरू आहे. दिपके यांनी म्हटले की, आम्ही काय मागत आहोत… आमचे स्पष्ट मत आहे की, ज्ञानेश कमार यांना काढून त्याठिकाणी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला बसवावे, ही आमची मागणी आहे. आम्ही हे म्हणत नाहीत की, सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. आम्ही फक्त म्हणत आहोत की, ज्ञानेश कुमार यांना काढून त्यांच्या ठिकाणी दुसरे मुख्य निवडणूक आयुक्त बसवले पाहिजेत.
सीजेपीच्या आंदोलनात पूर्वीपासून सक्रिय असलेल्या आणि आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात सक्रिय असलेल्या सीजेपीच्या प्रमुख नेत्या नेहा बोरा यांच्या एका व्हिडीओने खळबळ उडाली. नेहा यांनी व्हिडीओत म्हटले की, जेनझींचे आंदोलन देशात सगळीकडे होत आहेत. ते बांगलादेशातही झाले. त्यांचे खरेच आभार की, त्यांनी आम्हाला दिशा दाखवली.