Abhijeet dipke : ज्ञानेश कुमार यांनी जे निर्णय घेतले ते आता बदललेत, तर मग आता..अभिजीत दीपके यांचा रास्त सवाल

Abhijeet dipke : लाचखोरीप्रकरणी ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Abhijeet dipke : ज्ञानेश कुमार यांनी जे निर्णय घेतले ते आता बदललेत, तर मग आता..अभिजीत दीपके यांचा रास्त सवाल
Abhijeet Dipke-Gyanesh Kumar
| Updated on: Nov 04, 2026 | 4:45 PM

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ऑनलाईन फॉर्म 6 मधून SIR शी संबंधित घोषणापत्र हटवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजीत दीपकेने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निर्णय बदलल्यामुळे आता अजून मोठा प्रश्न निर्माण झालाय असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे. “वर्तमानपत्रात बातमी अली नसती आणि लोकांनी राग व्यक्त केला नसता तर काय झालं असतं?” असा प्रश्न अभिजीत दीपके यांनी विचारला. फॉर्म 6 बद्दलच्या ताज्या निर्णयानंतर अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना टार्गेट केलं.

“ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलण्यात आले. हे निर्णय बदलल्यामुळे आता अजून प्रश्न निर्माण होत आहेत. निर्णय बदलावे लागले तर यासाठी जबाबदार व्यक्तीने परिणाम भोगू नयेत का? पत्रकाराने ती बातमी छापली नसती, लोकांनी आक्रोश व्यक्त केला नसता? तर हे निर्णय बदलले असते का?. अनेक निर्णयांवर प्रश्न विचारले जात नाहीत. कारण कोणी ते समोर आणत नाहीत” असं अभिजीत दीपके म्हणाले.

Loading...

ज्ञानूने राजीनामा दिला पाहिजे

सीजेपीचे सहसंयोजक सौरभ दास म्हणाले की, “जर सर्व चुका कबूल केल्या असतील आणि यूटर्न घेतला असेल तर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर, सर्व चूका कबूल केल्या असतील यू-टर्न घेतला असेल तर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ज्ञानूने राजीनामा दिला पाहिजे. उत्तरदायित्वाशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सर्व निवडणुकांबद्दल संशय कायम राहिलं. भाजपं जिंकू शकते पण केवळ ज्ञानू आणि त्याच्या साथीदारामुळे. देशासाठी हे विनाशकारी असेल” असं सौरभ दास यांनी सांगितलं.

ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे आदेश

लाचखोरीप्रकरणी ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दशकापूर्वीचं हे प्रकरण आहे. केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित आहे. एक ठेकेदाराने त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्यावर दोन कोटी रुपये लाच मागितल्याचा आरोप केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us