वर्दी काढा, आरएसएसची चड्डी घाला, अभिजीत दिपके यांचे दिल्ली पोलिसांना सुनावले, थेट..

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अभिजीत दिपके यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली पोलिसांवरही त्यांनी निशाणा साधला.

वर्दी काढा, आरएसएसची चड्डी घाला, अभिजीत दिपके यांचे दिल्ली पोलिसांना सुनावले, थेट..
Abhijeet Deepke
| Updated on: Jul 25, 2026 | 12:42 PM

कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. फक्त धर्मेंद्र प्रधान यांचाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. अभिजीत दिपकेने म्हटले की, हे जेंनझी त्यांच्या आई वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार आहेत. ते कोणत्याच व्यवस्थेला घाबरत नाहीत. मोदींनी 12 वर्ष फक्त घाबरून ठेवले आहे. पण हे जेंनझी कोणालाच घाबरत नाहीत. बिहारमध्ये आज काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले. बिहार सरकारने ही चूक करू नये, जितके विद्यार्थी तुम्ही अटक कराल, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांना बघितले तरीही राग येतो. दिल्ली पोलिसांनी वर्दी उतरून आरएसएसटी चड्डी घालायला हवी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू असेल. 20 जूनपेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की, तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा लवकर राजीनामा घ्या, नाही तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल.

मी बघत आहे की, दिल्ली पोलिसांकडून चुकीचे वागले जात आहे. मला माझ्या काही सहकाऱ्यांचे मेसेज आले ते पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत, त्यांच्या घरी पोलिस जात आहेत. फक्त त्यांच्याच नाही तर त्यांच्या नातेवाईकांच्याही घरी जात आहेत. तिथे जाऊन पोलिस त्यांना त्रास देत आहे. दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे की, काही काम करायचे असेल चांगले काम करा.

पोलिस म्हणून घेण्याची यांची लायकी नाही. दिल्ली पोलिसांनी त्रास देणे बंद केले नाही तर आम्हाला दिल्ली पोलिस मुख्यालयापुढे आंदोलनाला बसावे लागेल. तुम्हाला माहिती आहे की, एकदा आम्ही बसलो की उठत नाहीत. अभिजीत दिपके यांनी सरकारसोबतच थेट दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अभिजीत दिपके ठाम आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us