AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटीनंतर NTA मध्ये बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया,थेट..

नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे मोठा गदारोळ झाला. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यादरम्यानच आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अत्यंत मोठा निर्णय घेतला. .

सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटीनंतर NTA मध्ये बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया,थेट..
Dharmendra Pradhan
| Updated on: Jul 25, 2026 | 12:02 PM
Share

देशभरात नीट पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकार पेपरफुटीविरोधात कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. पेपरफुटीमध्ये एनटीएच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप होत होता. अखेर सरकारने मोठे पाऊल उचलत ठपका ठेवत काही बड्या अधिकाऱ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA मधून बाहेरचा रस्ता दाखवला. हा मोठा दणकाच अधिकाऱ्यांना देण्यात आला. अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यांतर एनटीएने तात्काळ भरती प्रक्रियेसाठी जाहिरात काढली आहे. विविध पदांकरिता ही भरती प्रकिया राबवली जात आहे.

शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था एनटीए (NTA) ने चार जनरल मॅनेजर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी अर्ज मागवली आहेत. पूर्ण बदल करण्याच्या तयारीत एनटीए आहे. नीट पेपरफुटीनंतर वाद वाढला आहे.

ही भरती प्रक्रिया प्रा. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनुसार होणार आहे. NTA ने महाव्यवस्थापक या चारही पदांवर सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही मोठी बंपर भरती प्रक्रिया NTA मध्ये म्हणावी लागणार आहे.

प्रश्नसंच तयार करणे, परीक्षा गुणदान पद्धती, नॉर्मलायझेशन, इक्वेटिंग आणि कॅलिब्रेशन यांसारख्या प्रक्रियांचे पर्यवेक्षण अधिकारी करतील. हे अधिकारी देशातील 500 हून अधिक शहरांमधील आणि निवडक आंतरराष्ट्रीय परीक्षा केंद्रांवरील कामकाजावर देखरेख ठेवतील. कोणताही गैरव्यवहार या परीक्षेत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

16 पदांपैकी 12 पदे शैक्षणिक संशोधनासाठी, 2 पदे कायदेशीर संशोधनासाठी आणि 2 पदे वित्त आणि लेखा विभागासाठी आहेत. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती 24 महिन्यांत केली जाणार आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर सरकारनंतर सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. कडक कायदा करण्याच्या तयारीत सरकार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच