
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा सराय येथील रहिवासी असलेला राजकुमार (वय 24 वर्ष) या तरुणाचं लग्न शेखूपूरची रहिवासी असलेली मुस्लिम तरुणी अफरोज (वय 23 वर्ष) हिच्यासोबत 4 ऑगस्ट 2023 मध्ये झालं होतं. त्यांना एक चार महिन्यांचा मुलगा देखील आहे. मात्र आता अफरोज आपल्या पतीवर मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होत आहे. तिच्या पतीने राजकुमर यानेच आपल्या पत्नीवर आरोप केला आहे.
माझा आणि माझ्या चार महिन्यांच्या मुलाचा खतना करून आम्हाला मुस्लिम बनवण्यासाठी या तरुणीच्या नातेवाईकांकडून दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप या तरुणानं केला आहे. माझा मुलगा देखील त्यांच्याकडे आहे. पण मला मुस्लिम धर्म स्विकारायचा नाहीये, माझा मुलगा देखील मुस्लिम धर्म स्विकारणार नाही, असं या तरुणानं म्हटलं आहे. तसेच त्याने पोलिसांकडे आपल्याला संरक्षण द्यावं अशी मागणी देखील केली आहे. हा तरुण आचारी असून, स्वयंपाक बनवण्याचं काम करतो, याचदरम्यान या तरुणीची ओळख झाली होती.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर राजकुमार याच्यावर तरुणीच्या कुटुंबीयांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला, त्याला मशिदीमध्ये नेण्यात आलं.जबरदस्ती नमाज पठण करण्यात आलं, त्यानंतर त्याला मांस देखील खाऊ घालण्यात आलं.जेव्हा या सर्व गोष्टीला त्याने विरोध केला त्यानंतर त्या तरुणीने राजकुमारला तलाक दिला. मात्र पुन्हा त्यांची मध्यस्थी झाली,2024 पासून ते दोघे एकत्र राहू लागले.
मात्र ईदनिमित्त जेव्हा राजकुमार त्याच्या सासरवाडीला गेला तेव्हा समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला, माझ्या पत्नीचे नातेवाईक माझ्या मुलाला मांस खाऊ घालत होते, जेव्हा मी याचा विरोध केला तेव्हा माझ्या पत्नीने मौलानाला बोलावलं, तिच्या काही नातेवाईकांना बोलावं आणि पुन्हा एकदा माझ्यावर मु्स्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. माझी सुंता करण्याचा प्रयत्न केला.मला मासं खाऊ घातलं मात्र मी तिथून माझ्या मुलाना घेऊन पळाल्यानं वाचलो असा आरोप या तरुणानं केला आहे.