अभिनेत्री कंगनाने सुरु केला प्रचार, म्हणाली स्टार नाही तर तुमची मुलगी समजा

Loksabha election : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सात टप्प्यात मतदान होणार आहे. रहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार ही सुरु झाला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने देखील तिच्या मतदारसंघात रोड शो केला आहे. मला हिरोईन नाही तर तुमची मुलगी, बहिण समजा असे म्हटले आहे.

अभिनेत्री कंगनाने सुरु केला प्रचार, म्हणाली स्टार नाही तर तुमची मुलगी समजा
कंगना राणौत
| Updated on: Mar 29, 2024 | 4:27 PM

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री कंगना रणौतला मंडीतून उमेदवारी दिली आहे. कंगना रणौतने निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरुवात देखील केली आहे. यासाठी ती आपल्या मतदारसंघात पोहोचली आहे. तिने रोड शोने प्रचाराला सुरुवात केलीये. या दरम्यान ती म्हणाली की,  मी हिरोईन किंवा स्टार आहे असे समजू नका. कंगनाला तुमची मुलगी, बहीण आणि कुटुंब समजा. मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला भाजपने तिकीट दिल्यानंतर कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. मला माझ्या मातीची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तिने धन्यवाद म्हटले आहे.

कंगना रणौत आणि सुप्रिया श्रीनेट यांच्यात वाद

लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर अभिनेत्री कंगना ही दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यालयात पोहोचली होती. यावेळी कंगना रणौतने तिला उमेदवारी दिल्याने अध्यक्षांचे आभार मानले. यानंतर कंगना रणौत आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांच्यात वॉर रंगले. सुप्रिया श्रीनेट यांनी सोशल मीडियावरन कंगना रणौतबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.

सुप्रिया श्रीनेट यांचे स्पष्टीकरण

पण वाढता वाद पाहता सुप्रिया श्रीनेट यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी फेसबुक आयडीवरून ती पोस्ट डिलीट केली होती. यानंतर सुप्रिया श्रीनेट यांनी त्यांचे फेसबुक आयडी अनेक लोकांकडे असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट त्यांच्यापैकी कुणीतरी शेअर केली होती. असं त्यांनी म्हटले. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मी कोणत्याही महिलेबद्दल अशा अश्लील पोस्ट शेअर करू शकत नाही. याप्रकरणी अशी अश्लील पोस्ट कोणी शेअर केली याचा तपास सुरू आहे. ट्विटरवर माझ्या विडंबन नावाने चालणाऱ्या बनावट अकाऊंटविरोधातही तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री कंगना रणौत वरील आक्षेपार्ह पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत होता. काँग्रेसने सुप्रिया श्रीनेट यांना 2019 मध्ये ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्या मतदारसंघातून त्यांना आता उमेदवारी दिली नाही. सुप्रिया श्रीनेट यांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून मागील लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या पंकज चौधरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता