Weather Update : 15 दिवसांत 3 चक्रीवादळं; अर्नब, मुरासूनंतर ‘अकवान’चं संकट, महाराष्ट्रावरही मोठा परिणाम, कुठे-कुठे?

Weather Update Today : पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती तयार झाली आहे. पण आता चक्रीवादळांची एक श्रृखलाच सुरु झाली आहे. नोव्हेंबरमध्ये आता आणखी एका चक्रिवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस कोसळू शकतो. हवामान विभागाने काय वर्तवला अंदाज?

Weather Update : 15 दिवसांत 3 चक्रीवादळं; अर्नब, मुरासूनंतर अकवानचं संकट, महाराष्ट्रावरही मोठा परिणाम, कुठे-कुठे?
Cyclone akvan, weather update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 5:49 PM

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. ऑक्टोबरच्या शेवटी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागात अर्णब चक्रीवादळाच्या हाहाकारानंतर मुरासू चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळालेला. या दोन वादळांच्यानंतर आता बंगालच्या उपासागरात अकवान नावाचे आणखी एक नवे चक्रीवादळ तयार झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

अकवान चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा वेग वाढवत आहे. भारताच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ त्याच्या तीव्र स्वरुपात बदलणार आहे. ते 19 नोव्हेंबरपर्यंत अतितीव्र स्वरुपामध्य्ये रुपांतरीत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading...

हवामान विभागाने या वादळाबद्दल दिलेली माहिती

नाव: चक्रीवादळ अकवान
किनारपट्टीवर धडकण्याची अपेक्षित वेळ: २० नोव्हेंबर, २०२६ रोजी दुपारच्या सुमारास
संभाव्य क्षेत्र: आंध्र प्रदेश आणि यानम दरम्यान नेल्लोर ते तुनी
वाऱ्याचा वेग: १२०-१३० किमी प्रति तास
वाऱ्याचे झोत: ताशी १४५ किमी पर्यंत

दरम्यान, या चक्रीवादळामुळे ताशी 120 ते 130 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या चक्रिवादळाचा सर्वात मोठा फटका हा ओडिशाला बसू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे, पण देशातही इतर ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. मृत्यूंजय महापात्रा जे हवामान विभागाचे महासंचालक आहेत, त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

कुठे कुठे पावसाचा इशारा?

तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल: 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पाऊस, 18 ते 19 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस.

किनारपट्टी आंध्र प्रदेश: 18 नोव्हेंबरपासून पावसाला सुरुवात, 19,20 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी.

ओडिशा: 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पाऊस; 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस.

रायलसीमा: 19,20 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस आणि मुसळधार पाऊस

तेलंगणा: 20 नोव्हेंबर रोजी पूर्व भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 21 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस

छत्तीसगड: 20 नोव्हेंबर रोजी दक्षिण भागात आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर भागात मुसळधार पाऊस

पश्चिम बंगाल: 19-20 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस

झारखंड: 20, 21 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस

दरम्यान, महाराष्ट्रातल्या फक्त विदर्भामध्ये या वादळाचा थोडाफार परिणाम दिसू शकतो, 21 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us