Goa Political Crisis: गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ फसले! काँग्रेसचे पाच आमदार विधानसभेत प्रकटले

| Updated on: Jul 11, 2022 | 6:18 PM

गोव्यातील काँग्रेसचे पाच आमदार भाजपाच्या संपर्कात होते. मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो आणि दिगंबर कामत अशी या पाच आमदारांची नावे आहेत. हे सर्व जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. अखेरीस यांच मन वळवण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, अचानक या आमदारांनी पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थित राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. हे काँग्रेसचे पाच अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने आमदारांचे बंड थंड पडले आहे.

Goa Political Crisis: गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ फसले! काँग्रेसचे पाच आमदार विधानसभेत प्रकटले
Follow us on

पणजी : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यानंतर गोव्यातही मोठा राजकीय भूकंप अशा हालाचलू पहायला मिळत होत्या. मात्र, गोव्यातील आमदारांचे बंड थंड पडले आहे. गोव्यात भाजपा ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, भाजपचे गोव्यातील ‘ऑपरेशन लोटस’(BJP’s Operation Lotus) फसले आहे. भाजपच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे पाच आमदार(Congress MLA) विधानसभेत प्रकटले. हे पाचही आमदार रविवार पासून नॉट रिचेबल होते. मात्र, सोमवारपासून सुरु झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी(Assembly session) या आमदारांनी हजेरी लावली आहे. या आमदारांना पाहताच सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

गोव्यातील काँग्रेसचे पाच आमदार भाजपाच्या संपर्कात होते. मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो आणि दिगंबर कामत अशी या पाच आमदारांची नावे आहेत. हे सर्व जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. अखेरीस यांच मन वळवण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, अचानक या आमदारांनी पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थित राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. हे काँग्रेसचे पाच अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने आमदारांचे बंड थंड पडले आहे.

आपले काही आमदारल भाजपच्या संपर्कात असून बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजताच काँग्रेसनेही तात्काळ सावध पावले उचलली. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक यांना तात्काळ गोव्यात पाठवले. डॅमेज कंट्रोल थांबवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.

रविवारी मध्यरात्रीच काँग्रेसने भाजपच्या संपर्कात असलेल्या पाच आमदारां सोडून आपल्या इतर आमदारांना अज्ञातस्थळी हलवले होते. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसने विरोधी पक्षनेता मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली होती. अशा प्रकारे काँग्रेसने झपाझप हालचाली केल्या.

सोमवारी हे पाचही आमदार अधिवेशनासाठी सभागृहात हजर झाले. काँग्रेसचे सर्व आमदार एकजूट असल्याचे लोबो यांनी सांगीतले. कामत व लोबो यांना काँग्रेसने बडतर्फ केल्यामुळे अधिवेशनातील त्यांच्या उपस्थितीबाबत तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. याच्या बर्डतर्फीचा अधिवेशन कामकाजावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. सभापती या दोघाना असंलग्न आमदार असे संबोधून विधानसभेत बसण्याची त्यांची वेगळी सोय करू शकतात अशी माहिती कायदेतज्ज्ञ क्लिओफात आल्मेदा यांनी दिली.

काँग्रेसचे पाचही आमदार अधिवेशनात हजर राहिल्याने भाजपचे ऑपरेशन लोटस फसले आहे. आम्हाला कोणाचीही गरज नसून आमच्याकडे 25 आमदारांच्या पाठिंब्याचे स्थिर सरकार आहे. काँग्रेसला आता करण्यासारखे काही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.