AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme Pad 3 5G टॅबलेट लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Realme Pad 3 5G हा टॅबलेट येत्या नवीन वर्षात जानेवारीमध्ये ग्राहकांसाठी लाँच होणार आहे. कंपनीने या टॅबलेटच्या लाँचिंग तारीख जाहिर केली आहे. चला तर मग आजच्या लेखात लाँच तारीख आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Realme Pad 3 5G टॅबलेट लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या तारीख
Realme PadImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Dec 25, 2025 | 11:31 AM
Share

रियलमी कंपनी Realme 16 Pro सिरीजसोबतच, Realme Pad 3 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. कंपनीने आता नवीन टॅबलेटची लाँच तारीख देखील जाहीर केली आहे, त्यांच्या वेबसाइटवर आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Realme.com वर लाँच तारीख सांगण्यात आलेली आहे. केवळ लाँच तारीखच नाही तर टॅब्लेटचा डिस्प्ले आणि बॅटरी तपशील देखील उघड करण्यात आला आहे. चला तर मग रियलमीच्या या नवीन टॅबलेट ची किंमत लाँच तारीख आजच्या लेखात जाणून घेऊयात.

Realme Pad 3 5G भारतात लाँच होण्याची तारीख

रियलमी कंपनी 6 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारात त्यांचा नवीन टॅबलेट लाँच करणार आहे. हा टॅबलेट स्टायलस सपोर्ट आणि नेक्स्ट एआय टूल्सने सुसज्ज असेल. टॅबलेटच्या डिझाइनवर नजर टाकल्यास असे दिसून येते की त्यात एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल आणि बॅक पॅनलच्या मध्यभागी कंपनीची ब्रँडिंग दिसून येते. हा टॅबलेट काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल.

Realme Pad 3 5G स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: Realme कंपनीच्या या नवीन टॅबलेटमध्ये 2.8K बुक व्ह्यू डिस्प्ले असेल.

बॅटरी क्षमता: या टॅबलेटला पॉवर देण्यासाठी 12200 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Realme Pad 3 5G ची अपेक्षित फिचर्स

X वरील एका पोस्टमध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी Realme Pad 3 5G च्या कथित मार्केटिंग पेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये टॅब्लेटचा चिपसेट आणि ऑपरेटिंग सिस्टम उघड झाला आहे. टॅब्लेटमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 MAX प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा टॅब्लेट Android 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो. तसेच हा टॅबलेट 6.6mm जाड असेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 296 ppi पिक्सेल डेन्सिटीसह येऊ शकतो.

हा टॅबलेट जुलै 2023 मध्ये भारतीय बाजारात लाँच झालेल्या Realme Pad 2 चा अपग्रेड असणार आहे. या टॅबलेटमध्ये 11.5-इंचाचा 2K डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि 450 निट्स पीक ब्राइटनेस आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, टॅबलेटमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 8GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज आहे. हे डिव्हाइस 8360mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि 3W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.