
भारत आणि मालदीवमधील तणावा दरम्यान लक्षद्वीप चर्चेत आला होता. परंतु आता मालदीव आणि इस्त्रायलमधील तणावात भारताचा लक्षद्वीप ट्रेंड होत आहे. इस्त्रायलकडूनही बॉयकोट मालदीव ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली आहे. मालदीवपेक्षा भारत सुंदर आहे, असे सांगत भारतातील विविध पर्यटन स्थळाची माहिती इस्त्रायलकडून देण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी लक्षद्वीपचे फोटो शेअर करत पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांच्या मिरच्या मालदीवला लागल्या होत्या. मालदीव सरकारमधील दोन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भारतीयांनी बायकोट मालद्वीव ही मोहीम सुरु केली. त्याचा चांगलाच फटका मालद्वीपला बसत आहे. आता इस्त्रायल भारताच्या पावलावर पाऊल टाकत आहे.
इस्रायली पासपोर्टधारकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याचा निर्णय मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी घेतला. त्यानंतर इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी आपल्या देशातील नागरिकांना भारतात प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. दूतावासाने सांगितले की, इस्रायली पर्यटकांचे भारतात स्वागत केले जाते. त्यांच्यासाठी गोवा, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप आणि केरळच्या समुद्रकिनारे चांगली पर्यटन स्थळे आहे. इस्त्रायल नागरिकांनी भारतातील या पर्यंटन स्थळांना भेट द्यावी, असा सल्ला इस्त्रायली राजदूतांनी दिला आहे.
इस्रायलच्या दूतावासाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, गोवा आणि केरळमधील समुद्रकिनाऱ्यांचे फोटो समाविष्ट आहेत. इस्त्रायली दूतावासाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मालदीव आता इस्रायलींचे स्वागत करत नाही. परंतु भारतात काही सुंदर आणि आश्चर्यकारक सागरी किनारे आहेत. ज्या ठिकाणी इस्रायली पर्यटकांचे स्वागत केले जाते.
एक्स पर मीहा श्वार्टजनबर्ग यांनी लिहिले आहे की ‘मालदीवकडून दहशतवाद्यांना पाठीशी घातले जात आहे. तसेच इस्त्रायली पासपोर्टवर प्रतिबंध लावण्यात आले आहे. यामुळे इस्त्रायलचे नुकसान होणार नाही. आता मालदीवला बायकॉट करण्याची वेळ आली आहे. मी ब्रिटिश-इस्त्रायली म्हणून कधीही मालदीवमध्ये जाणार नाही. त्यापेक्षा भारतातील समुद्र किनारे सुंदर आहेत.