AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : उपकर्णधार स्मृती मंधानाला मोठा झटका, लग्न मोडल्यानंतर क्रिकेटरसोबत नक्की काय झालं?

ICC Womens Rankings Update: आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या महिला खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्मृती मंधाना हीला मोठा झटका लागला आहे.

Smriti Mandhana : उपकर्णधार स्मृती मंधानाला मोठा झटका, लग्न मोडल्यानंतर क्रिकेटरसोबत नक्की काय झालं?
Team India Smriti MandhanaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 23, 2025 | 5:17 PM
Share

स्मृती मंधाना हीच्यासाठी गेले काही आठवडे वाईट स्वप्नांसारखी राहिले. ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर स्मृती मंधाना हीचं सांगलीत पलाश मुच्छल याच्यासह लग्न होणार होतं. मात्र लग्नात अनेक विघ्न आली. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पलाशची प्रकृती बिघडली. त्यानंतर स्मृती-पलाशचं लग्न मोडलं. स्मृतीने याबाबतची माहिती दिली. स्मृ्ती वैयक्तिक आयुष्यातील या संकटांवर मात करत खंबीरपणे उभीर राहिली. टीम इंडिया सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. स्मृती या मालिकेचा भाग आहे. स्मृतीला या दरम्यान मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजयी सलामी दिली. भारताने 122 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. स्मृतीने या सामन्यात 25 धावा केल्या. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 23 डिसेंबरला होणार आहे.

आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. स्मृतीला या रँकिंगमध्ये आयसीसीने झटका दिला आहे. स्मृतीला आयसीसी रँकिंगमधील सिंहासन अर्थात पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. स्मृतीची आयसीसी वनडे बॅट्समन रँकिंगमध्ये दुसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने स्मृतीला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

लॉराकडून स्मृतीला झटका

लॉरा वॉल्डवॉर्ट हीने स्मृतीला मागे टाकत पहिल्या स्थानी कब्जा केला आहे. लॉराने नुकतंच आयर्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. लॉराला त्याचा फायदा झाला आहे. लॉरा याआधीही पहिल्या स्थानी राहिली आहे.

दीप्ती शर्माची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

तसेच टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. दीप्ती टी 20I रँकिंगमध्ये नंबर 1 ऑलराउंडर ठरली आहे. दीप्तीची कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दीप्तीने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात 1 विकेट घेतली होती. त्याचा दीप्तीला फायदा झाला. दीप्तीने ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँड हीला पछाडत पहिलं स्थान काबीज केलं.

जेमीमाह रॉड्रिग्सचा धमाका

त्याशिवाय टी 20I बॅटिंग रँकिंगमध्ये जेमीमाह रॉड्रिग्स हीने 5 स्थानाची झेप घेत टॉप 10 मध्ये धडक दिली आहे. जेमी 14 व्या स्थानावरुन 9 व्या क्रमांकावर पोहचली आहे. स्मृती मंधाना तिसऱ्या तर शफाली वर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...