मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, ट्रम्प यांचा भीषण हल्ला, युद्ध पुन्हा पेटलं, जगभरात मोठी खळबळ
नुकतीच अमेरिकेमध्ये मीडटर्म निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान निकाल लागून दोन दिवस होत नाहीत तोच अमेरिकेकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे.

अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये असलेल्या केशम बेटाला अमेरिकेकडून निशाणा बनवण्यात आलं आहे. याबाबत अमेकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: माहिती दिली आहे. आम्ही इराणवर पुन्हा एकदा हल्ले केले आहेत, ज्याचा उद्देश इराणची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट करणं हा होता, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेच्या या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या हल्ल्यादरम्यान आम्ही अमेरिकेचं एमक्यू 9 ड्रोन पाडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेकडून अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यांमुळे आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये देखील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये पराभवाचा झटका बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच इराणवर हल्ला केला आहे, ट्रम्प यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत इराणने माहिती देताना सांगितलं की, स्ट्रेट ऑफ होर्मूजच्या केशम बेटावरील सूजा परिसरात हल्ले झाले आहेत. आवाज येताच आम्ही देखील अमेरिकेचं एमक्यू 9 ड्रोन पाडलं आहे. या हल्ल्यामध्ये कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही. दरम्यान अमेरिकेकडून ज्या भू भागावर हल्ला करण्यात आला, तो भाग कच्च्या तेल वाहतुकीसाठी इराणच्या दृष्टीकोणातून खूपच महत्त्वाचा आहे. मात्र या हल्ल्यांमुळे आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं काय केला दावा?
दरम्यान अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आम्ही इराणवर बचावात्मक पद्धतीने ‘डिफेंसिव्ह स्ट्राईक केल्याचं अमेरिकन सैन्याने म्हटलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये असलेल्या केशम आणि हेंगाम बेटाला अमेरिकेकडून निशाणा बनवण्यात आलं आहे, सोबतच इराणच्या अब्बास बंदरामध्ये देखील हल्ला झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं इराणवर हे हल्ले अशावेळी केले आहेत, नुकताच अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकीचा निकाल समोर आला आहे, या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच इराणवर हल्ला केला आहे.